शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यासाठी सव्वाआठ कोटींचा येणार निधी, उभारणार ३३ ग्रामपंचायती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:39 IST

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५०० ग्रामपंचायतींसाठी ३२४ कोटी २८ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची कार्यालये उभी करण्यासाठी तब्बल सव्वाआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ही तरतूद करण्यात आली असून आता कार्यालयांशेजारी नागरी सुविधा केंद्राच्या खोलीसाठी एक स्वतंत्र खोलीही बांधण्यात येणार आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५०० ग्रामपंचायतींसाठी ३२४ कोटी २८ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेतील ६० टक्के निधी केंद्र शासनाचा असून ४० टक्के निधी राज्य शासनाचा आहे. केंद्र शासनाने निकष बदलताना आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशेजारी नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र खोली बांधण्याचेही नियोजन केले आहे.येथून विविध प्रकारच्या ऑनलाइन दाखल्यापांसून अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. म्हणूनच मूळ ग्रामपंचायतीसाठी २० लाख रुपये आणि या नागरी सुविधा केंद्राच्या खोलीसाठी ५ लाख रुपये असा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती

  • करवीर : केर्ले, सरनोबतवाडी, हणमंतवाडी, आमशी, बोलोली, वरणगे, चिंचवाड, दिंडनेर्ली
  • गडहिंग्लज : हिटणी, हसूरचंपू, हलकर्णी
  • हातकणंगले : घुणकी, वडगाव, पाडळी
  • कागल : चिखली
  • राधानगरी : तुरंबे, आवळी बुद्रुक, म्हासुर्ली,
  • शाहूवाडी : कडवे
  • शिरोळ : कोथळी, उमळवाड, शेडशाळ, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण, हिरोली