शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

Kolhapur Crime: डिलिव्हरी बॉयने कंपनीला घातला दोन लाखांचा गंडा, कसा केला कांड... वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:55 IST

बनावटगिरी अंगलट आली, डिलिव्हरी बॉयसह दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : फ्लिपकार्ट कंपनीच्या कोल्हापुरातील डिलिव्हरी हब स्टोअरमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मित्राच्या मदतीने कंपनीला दोन लाख सात हजारांचा गंडा घातला. बनावट ग्राहकांच्या नावे मागवलेले दोन आयफोन, एअर पॉड आणि ॲपल वॉच घेऊन रिकामे बॉक्स कंपनीला परत पाठवत फसवणूक केली.

याबाबत कर्मचारी अभय महेश करणूरकर (रा. सिद्धार्थनगर, कोल्हापूर) आणि त्याचा मित्र अमिर सोहेल मकानदार (रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) या दोघांवर शनिवारी (दि. ११) रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय करणूरकर हा ताराबाई पार्क येथे फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी हब स्टोअरमध्ये काम करीत होता. २७ फेब्रुवारी ते १५ मे २०२५ या कालावधीत त्याने अमिर मकानदार या मित्राच्या मोबाइलवरून आकाश पाटील (रा. कोल्हापूर) आणि मित्तल (मूळ रा. कुर्ला, मुंबई, सध्या रा. कोल्हापूर) या बनावट नावाने दोन ॲपल आयफोन, एक एअर पॉड आणि एक ॲपल वॉचची ऑर्डर बुक केली.ग्राहकांना वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय त्यांनी बुकिंगवेळी निवडला होता. ऑर्डर केलेल्या वस्तू कंपनीच्या स्टोअरमध्ये येताच करणूरकर याने डिलिव्हरीसाठी त्या ताब्यात घेतल्या. त्यातील वस्तू काढून घेतल्या. पार्सल पुन्हा पॅक करून संबंधित ग्राहक मिळत नसल्याचे कारण देत त्यांनी चारही वस्तूंचे पार्सल स्टोअरमध्ये जमा केले.कंपनीच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस येताच अधिकारी प्रकाश रतिलाल शहा (६४, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डिलिव्हरी बॉय करणूरकर आणि त्याच्या मित्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दोन्ही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.बनावटगिरी अंगलट आलीकरणूरकर याने बनावट ग्राहकाच्या नावे सुरुवातीला एक मोबाइल मागवला. रिकामे पार्सल स्टोअरमध्ये जमा करून यंत्रणेचा अंदाज घेतला. कंपनीकडून तातडीने काहीच प्रतिक्रिया आली नसल्याने त्याने पुन्हा बनावट ग्राहकांच्या नावाने तीन ऑर्डर बुक करून फसवणूक केली. मात्र, त्याची बनावटगिरी उघडकीस येताच गुन्हा दाखल झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Delivery boy cons Flipkart of ₹2 lakhs with fake orders.

Web Summary : A Flipkart delivery boy in Kolhapur, with his friend, defrauded the company of ₹2 lakhs. They ordered iPhones and accessories under fake names, replaced them with empty boxes, and returned them. Police have registered a case and are investigating.