Kolhapur: खेळायला गेला, उशीर झाला तरी घरी आला नाही; नातेवाइकांनी शोधाशोध केली, सीसीटीव्हीमुळे धक्कादायक घटना समोर आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:30 IST2026-02-12T12:29:59+5:302026-02-12T12:30:15+5:30
चिमुकल्याच्या मृत्यूने बारगीर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

Kolhapur: खेळायला गेला, उशीर झाला तरी घरी आला नाही; नातेवाइकांनी शोधाशोध केली, सीसीटीव्हीमुळे धक्कादायक घटना समोर आली
कोल्हापूर : जवाहरनगर सरनाईक वसाहतीतील घराजवळील खड्ड्यात पडून एकुलता पाच वर्षांचा मुलगा मयत झाला. इजान अक्रम बारगीर असे त्याचे नाव आहे. तो बेपत्ता झाला म्हणून नातेवाईक शोध घेत होते. जवळील धार्मिक स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो खड्ड्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याची शोधमोहीम थांबली मात्र त्याचा खड्ड्याने जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बारगीर यांच्या घराजवळ बांधकामासाठी खोदलेला खड्डा अनेक दिवसांपासूनचा आहे. जवळच उर्दू माध्यमाची शाळा आहे. तरीही तो खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास खेळण्यासाठी इजान घराबाहेर पडला. आई, वडील तो बाहेर खेळत आहे, म्हणून आपल्या कामात होते. मात्र, तो उशीर झाला तरी घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली.
परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले. त्यावेळी खड्ड्यापर्यंत तो गेल्याचे दिसले. त्यावेळी खड्डयात मुलगा मृतावस्थेत आढळून आला. सीपीआरमध्ये त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. इजानचे वडील वखारीत काम करतात. चिमुकल्याच्या अशा मृत्यूने बारगीर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.