Kolhapur: गडहिंग्लजमध्ये मध्यवस्तीत वेश्या अड्डा, दोन महिलांसह ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:04 IST2024-07-09T14:03:12+5:302024-07-09T14:04:22+5:30
गडहिंग्लज : शहरातील मध्यवस्तीतील हुजरे गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी काल, सोमवारी रात्री छापा टाकला. छाप्यात ...

Kolhapur: गडहिंग्लजमध्ये मध्यवस्तीत वेश्या अड्डा, दोन महिलांसह ७ जणांना अटक
गडहिंग्लज : शहरातील मध्यवस्तीतील हुजरे गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी काल, सोमवारी रात्री छापा टाकला. छाप्यात उत्तरप्रदेश व मुंबई येथील दोन पीडित महिला, वेश्यागमनासाठी आलेल्या दोघांसह ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. रहिवासी भागातील अशा पहिल्याच कारवाईमुळे शहरासह सीमाभागात खळबळ उडाली.
शहरातील मध्यवस्तीत या अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा होती. पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून हा छापा टाकला. छाप्यात मोबाईल व रोकड जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी युवराज अरुण पोदार (रा. भैरापुर ता. हुक्केरी) अनिकेत मारुती जाधव (रा.संकेश्वर,ता.हुक्केरी) ओंकार कुमार पाथरवट (रा. हुजरे गल्ली, गडहिंग्लज) यासीन फारूक नाईकवाडी, सोहेलखान महंमदअली पठाण (दोघेही रा. दुंडगा मार्ग, गडहिंग्लज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिला कॉन्स्टेबल संपदा कुट्रे यांच्या फिर्यादीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमाखाली गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.