शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:11 IST

एकमेकाला बघून घेण्याची भाषा, गांधी कॅम्प परिसरात तणाव

इचलकरंजी : विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून भाजपमधील कार्यकर्त्यांच्यात बुधवारी सायंकाळी गांधी कॅम्प चौकात जोरदार राडा झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगवले. मात्र, या दरम्यान माजी उपनगराध्यक्ष व एका माजी नगरसेविकेच्या पतीमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.भाजपच्या उमेदवाराचे कार्यकर्ते शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्यांच्यातच जोरदार हाणामारी झाली. कपडे फाटेपर्यंत झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक हातात बॅट व पट्टा घेऊन काही युवक बाहेर पडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काय चालू आहे, हे कोणाला काय समजेना. गर्दी, जमाव आणि गोंधळ झाल्याची माहिती समजताच तातडीने पोलिस दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जमावाला पांगवले.

Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळमाजी उपनगराध्यक्ष व एका माजी नगरसेविकेच्या पतीमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. माजी उपनगराध्यक्षाने तुला गुलाल लावायला देत नाही, असे म्हटल्यानंतर तो वाद आणखीनच चिघळला. पोलिस व संबंधित कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला नेऊन वातावरण शांत केले. राखीव पोलिस दलाची तुकडीही तातडीने मागवून घेण्यात आली. सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे मुख्य रस्त्यावर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. रात्रभर पोलिसांची गाडी या परिसरात ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाPoliceपोलिस