रमणमळ्यात ९० हजारांची चोरी, शाहूपुरी पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 14:43 IST2019-03-07T14:40:54+5:302019-03-07T14:43:13+5:30

रमणमळा येथे बंद बंगल्याचे लोखंडी कॅच वाकवून ७० हजार रुपये, दोन पिळाच्या सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत अरुण वसंतराव तिरोडकर (वय ६९, रा. ओमकार बंगला, प्लॉट नंबर , शासकीय गोडावूनजवळ, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली.

90 thousand stolen in Ramanam, | रमणमळ्यात ९० हजारांची चोरी, शाहूपुरी पोलिसात तक्रार

रमणमळ्यात ९० हजारांची चोरी, शाहूपुरी पोलिसात तक्रार

ठळक मुद्देरमणमळ्यात ९० हजारांची चोरीशाहूपुरी पोलिसात नोंद

कोल्हापूर : रमणमळा येथे बंद बंगल्याचे लोखंडी कॅच वाकवून ७० हजार रुपये, दोन पिळाच्या सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत अरुण वसंतराव तिरोडकर (वय ६९, रा. ओमकार बंगला, प्लॉट नंबर , शासकीय गोडावूनजवळ, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तिरोडकर यांचा एक मार्च ते मंगळवार (दि. ५) दरम्यान बंगला बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लोखंडी कॅच वाकवले होते.

तिरोडकर हे बुधवारी घरी आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. त्यानूसार पोलिसांनी पंचनामा केला.

बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये, दहा ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ९० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.याची नोंद पोलिसात झाली आहे.
 

 

Web Title: 90 thousand stolen in Ramanam,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.