कळंब कारागृहातून 9 कैद्यांची सुटका; नातेवाईक गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:58 IST2018-10-06T19:56:37+5:302018-10-06T19:58:13+5:30

कुटुंबीय, नातेवाईकांना भेटताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले

9 prisoners released from kalamb jail in kolhapur | कळंब कारागृहातून 9 कैद्यांची सुटका; नातेवाईक गहिवरले

कळंब कारागृहातून 9 कैद्यांची सुटका; नातेवाईक गहिवरले

कोल्हापूर : गेली अडीच वर्ष कुटूंबापासून दूर असलेल्या आणि कारागृहाच्या भिंतीआड आयुष्य जगणाऱ्या नऊ कैद्यांची कळंबा मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच समोर स्वागतासाठी उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाहून सर्वांचाच कंठ दाटून आला. त्यांनी गळ्यात पडून आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली.



कारागृह प्रशासनाकडून वीस कैद्यांची यादी शासनाला सादर करण्यात आली होती. त्यापैकी नऊ कैद्यांच्या सुटकेला शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार गांधी जयंती निमित्त कारागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी समारोप कार्यक्रमास सेवानिवृत्त कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शिक्षा माफ झालेल्या कैद्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कैद्यांना महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.

Web Title: 9 prisoners released from kalamb jail in kolhapur