शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

‘रेशीम’मधून कोल्हापूर जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी 

By भीमगोंड देसाई | Updated: May 14, 2024 13:39 IST

शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून प्रोत्साहन

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहेत. त्यांना शासनाच्या रेशीम कार्यालयांकडून प्रोत्साहन मिळत असून त्यांना गरजेनुसार अनुदानावर अंडीपुंजाचा पुरवठा केला जात आहे.राज्यातील एकमेव अंडीपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लजला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. सध्या करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील ८३७ शेतकऱ्यांनी ८३५ एकर जमिनीवर रेशीम निर्मितीसाठी तुतीच्या वनस्पतीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना या वर्षी ३ लाख ४९ हजार ४१० अंडीपुजांची वितरण शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून करण्यात आले आहे.एक किलोला ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान अंडी पुजांसाठी देण्यात आले आहे. इतके अंडीपुंजा घेऊन ८३७ शेतकऱ्यांनी २ लाख २६ हजार ७०७ रेशीम कोषचे उत्पादन केले. ५०० ते ६०० रुपये किलो दरानी खुल्या बाजारात त्याची विक्री केली. यातून त्यांना एकूण १२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढल्याचा दावा रेशीम कार्यालयाचा आहे.

- रेशीम शेतीसाठी किती अनुदान मिळते?रोजगार हमी योजनेतून एक एकरसाठी ४ लाख १८ हजार तर सिल्क समग्र योजनेतून ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळते. अनुदान मिळण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्याला जून, जुलै महिन्यात तुतीची लागवड लागेल. त्यानंतर अंडी पुंजापासून रेशीमनिर्मितीसाठी ५० बाय २२ इतका शेड उभारावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्याला सुरुवातीला स्वत:कडून पैसे गुंतवावे लागणार आहे. त्यानंतर पात्र ठरल्यानंतर अनुदान मिळू शकते. रोजगार हमीचे अनुदान त्या त्या वेळी मजुरांच्या नावे जमा होते.

अनुदानासाठी अर्ज कोठे करावा?रेशीम कार्यालय, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर.

एकरी उत्पन्न किती मिळू शकते?रेशीम शेतीतून एक एकरमध्ये कमीत कमी खर्च वजा जाता दोन लाखांचे उत्पन्न वर्षाला मिळू शकते. जोडधंदा म्हणून करता येते. रेशीमला मागणी चांगली असल्याने बाजारपेठ शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही.

- तालुकानिहाय रेशीम उत्पादक शेतकरी संख्या अशीकरवीर :१२७हातकणंगले : ८४गडहिंग्लज : ६२७

रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. बाजारपेठही सहज उपलब्ध आहे. रेशीम उत्पादनासाठी अनुदानही मिळते. म्हणून याकडे शेतकऱ्यांनी वळावे. - राजेश कांबळे, रेशीम विकास अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी