शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:59 IST

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखाली

निवास पाटीलसोळांकूर: काळम्मावाडी धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग विद्युत जनित्राद्वारे नदीपात्रात सुरु आहे. धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने कोणत्याही क्षणी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण परिक्षेञात आज दिवसभरात २६ मिलिमीटर  पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर १९०२  मिलिमीटर पाऊस होऊन धरणात १९.७० टी.एम.सी म्हणजे ८० टक्के इतका पाणीसाठा  आहे. पाऊस उशिरा सूरू झाला असला तरी गेल्या काही दिवसात संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. यावर्षी धरणात केवळ मृत पाणी साठा शिल्लक होता. यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट ओढावले होते. मात्र पावसाच्या दमदार हजेरीमुळे पाणी टंचाईचे संकट टळले.सतर्कतेचा इशारा धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत  वाढ होत आहे. जलाशय परीचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरिता  आज  धरणाच्या वक्र द्वारातून व विद्युत गृहातून नदीपात्रात टप्प्या टप्प्या ने २००० क्युसेक विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुधगंगा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखालीजिल्ह्यात शुक्रवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या, मात्र दुपारनंतर उघडीप राहिली. अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी ऊन पावसाचा खेळही सुरु राहिला. धरणक्षेत्रात चांगला पाऊस असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. मात्र आज सकाळी सर्व दरवाजे बंद झाले आहेत.पाच-सहा दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरु असल्याने नद्यांची पाणी पातळी हळूहळू ओसरू लागली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची उघडीप होती, मात्र रात्री रिपरिप सुरु झाली. शुक्रवारी सकाळ पासून जोर कायम होता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड व करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर अधिक होता.धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ८५७५ घनफूट पाणी वारणा नदीत येत असल्याने येथील पुराचे पाणी हळूहळू कमी होत असल्याने यावरील सहा बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीWaterपाणी