शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यातील ७५ गावे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST

प्रकाश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली ...

प्रकाश पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. इतर तालुक्याच्या तुलनेत करवीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, तिप्पट असल्याने तालुका हॉटस्पॉट झाला होता. गेल्या १५ दिवसांपासून करवीर रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून, तालुक्यातील ११८ गावांपैकी ७५ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. रुग्णसंख्या घटल्यामुळे करवीरला दिलासा मिळाला आहे

करवीर तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होती. जून महिन्यात शहरालगतच्या गावांबरोबर ग्रामीण भागातही दुसऱ्या लाटेत कोरोनाने हाहाकार माजवला. अनेक गावांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० ते २५० वर पोहोचली होती. दररोज सापडणाऱ्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०० ते ६०० वर पोहोचली होती.

कोरोनाला रोखण्यासाठी अनेक गावांत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत होती; पण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी येत नव्हती. दररोज कोरोनामुळे मृतांची संख्या ही आठ ते नऊवर पोहोचल्याने आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. गेल्या १५ दिवसांपासून मात्र कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

चौकट

आजअखेर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थितीचा लेखाजोखा

एकूण रुग्णसंख्या - २२९९०

बरे झालेली रुग्णसंख्या - २२३४२

कोरोनाने मृत्यू - ४३०

सध्या ॲक्टिव्ह रुग्ण - २१८

कोरोनामुक्त गावे - ७५