२१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:30 IST2026-03-07T18:30:04+5:302026-03-07T18:30:41+5:30

सुमारे २५ ते ३० किलो वजन असलेले साहित्य घेत पूर्ण केला प्रवास

6500 kilometers in 21 days Four from Kolhapur reach Nepal via Uttarakhand on Bullet | २१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ 

२१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ 

कोल्हापूर : येथील रॉयल रायडर्स, कोल्हापूर या नामांकित रायडिंग क्लबच्या सदस्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एनआरएम नेपाळ रायडर्स मीटमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवत कोल्हापूरच्या क्रीडाविश्वाचा गौरव वाढविला. क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार, संचालक शीतल मुकरे, तसेच पांडुरंग चव्हाण आणि जोनिश जैन या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गेनेपाळ गाठले आणि २१ दिवसांत ६,५०० किलोमीटरचा प्रदीर्घ आणि साहसी प्रवास पूर्ण करून पुन्हा कोल्हापूरला परतले आहेत.

क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार, संचालक शीतल मुकरे, पांडुरंग चव्हाण आणि जोनीश जैन या चौघांनी नेपाळ येथे फ्रेंड्स ऑफ राॅयल एनफिल्ड या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात दिमाखदार उपस्थिती लावली. रात्री तीन डिग्री तापमान, उत्तर प्रदेशातील सोनोली बॉर्डर, बिहारच्या खानोल बॉर्डरपासून डोंगराळ, उंचसखल भागांतून प्रवास, सरासरी ३०० किलोमीटरचे लक्ष्य, सुमारे २५ ते ३० किलो वजन असलेले साहित्य घेत महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, बिहार या सात राज्यांतून नेपाळचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. 

रस्ते सुरक्षा जनजागृती करणे आणि नेपाळमधील पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. ही संस्था नेपाळमधील ७८ रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करते. नेपाळ पर्यटन विभागाच्या निमंत्रणावरून भारतातील विविध रायडिंग क्लबना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान, या रायडर्ससोबत उपाध्यक्ष यश सबनीस आणि हर्ष सबनीस हे कोल्हापूर ते उत्तराखंड आणि परत कोल्हापूर असा प्रवास करत उत्तराखंड येथे आयोजित ‘ब्रदरहूड ऑफ बुलेटर्स ॲण्ड मोटारसायकलिस्ट कान्सोरिटीएम’ या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यात सहभागी झाले. ऋषिकेश येथील ही संघटना देशातील ८०० रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करते.

Web Title : कोल्हापुर के राइडर्स ने नेपाल जीता: 21 दिनों में 6500 किमी बुलेट यात्रा

Web Summary : कोल्हापुर के रॉयल राइडर्स ने नेपाल की अंतर्राष्ट्रीय मीट में उत्कृष्ट प्रदर्शन किया, 21 दिनों में 6,500 किमी से अधिक बुलेट से सात राज्यों की यात्रा की। सड़क सुरक्षा और पर्यटन को बढ़ावा देते हुए, वे नेपाल के पर्यटन विभाग के निमंत्रण पर 78 नेपाली क्लबों के राइडर्स में शामिल हुए।

Web Title : Kolhapur Riders Conquer Nepal: 6500 km Bullet Journey in 21 Days

Web Summary : Kolhapur's Royal Riders excelled at Nepal's international meet, riding बुलेट through seven states over 6,500 km in 21 days. Promoting road safety and tourism, they joined riders from 78 Nepalese clubs after an invitation from Nepal's tourism department.