शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात दंगलप्रकरणी ५५ अटकेत

By admin | Updated: July 14, 2015 01:14 IST

गांधीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केला होता हवेत गोळीबार

बेळगाव : येथील गांधीनगरमध्ये रविवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी ५५ जणांना अटक केली आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून ही घटना घडली होती. सोमवारी दिवसभर बेळगावमध्ये तणावपूर्ण शांतता होती. रविवारी रात्री दंगलखोरांनी तुफान दगडफेक केली होती. जमावाने ३० पेक्षा जास्त दुचाकी व चारचाकी गाड्यांची तसेच अनेक घरांची तोडफोड केली होती. पोलिसांचे एक वाहनही पेटविले. दगडफेकीत २० जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एक पोलीस अधिकारी, सहा पोलिसांचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या आठ नळकांड्या फोडाव्या लागल्या; तरीही जमाव नियत्रंणात आला नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यावर जमाव पांगला आणि परिस्थिती थोडी नियंत्रणात आली. सध्या गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी दुपारी कन्नड शाळेच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यातील किरकोळ कारणामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दंगलीबाबत अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. परगावांहून पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत ५५ जणांना अटक केली आहे. रविवारी दुपारी सरकारी कन्नड, मराठी आणि उर्दू शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी एका व्यक्तीने हरकत घेतली. याला दुसऱ्या गटाच्या पालकांनी विरोध केला. नंतर हे प्रकरण इतरांनी हस्तक्षेप करून मिटविले. क्रिकेट खेळताना पुन्हा दोन संघात वाद निर्माण झाला. नंतर मैदान रिकामे करण्याची मागणी करण्यात आली. त्यास दुसऱ्या गटाने हरकत घेतली. त्यातून दोन्ही गटांत वादावादी झाल्यावर हे प्रकरण मिटविण्यात आले; पण रविवारी रात्री मैदानावरील वादाने हिंसक वळण घेतले. एका गटाच्या जमावाने आपल्या मुलांना मैदानावर खेळू दिले नाही म्हणून दुर्गामाता रोडवर पार्क करण्यात आलेल्या वाहनांची मोडतोड, जाळपोळ करण्यास सुरुवात केली. याला तेथील रहिवाशांकडून प्रतिकार केला. रात्री अकरा वाजता पोलिसांना हिंसाचाराची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे गेले, तर त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहन पेटविण्यात आले. नंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस आयुक्त एस. रवि, पोलीस उपायुक्त अनुपम अगरवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी गांधीनगर येथे धाव घेतली. पोलीस कुमकही मागवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली. सध्या गांधीनगर भागात १४४ कलम लावण्यात आले आहे . (प्रतिनिधी)