Kolhapur: 'गोकुळ'मध्ये कराराचा भंग करून ५१ जणांना केले सुपरवायझर, कामगार संघटनेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:48 IST2026-02-19T11:47:33+5:302026-02-19T11:48:15+5:30

कोणत्याही क्षणी संपाचे हत्यार उपासण्याचा इशारा

51 people were made supervisors in Gokul by violating the contract | Kolhapur: 'गोकुळ'मध्ये कराराचा भंग करून ५१ जणांना केले सुपरवायझर, कामगार संघटनेचा विरोध

Kolhapur: 'गोकुळ'मध्ये कराराचा भंग करून ५१ जणांना केले सुपरवायझर, कामगार संघटनेचा विरोध

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये (गोकूळ) कामगार संघटनेसोबत झालेल्या सामंजस्य कराराचा भंग करून संचालक मंडळाने मर्जीतील ५१ लोकांना पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून पदोन्नती दिल्याने इतर कामगारांमध्ये खदखद व्यक्त होत आहे. संचालक मंडळाने कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत विचार न केल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटनेने दिला आहे. संघटनेच्यावतीने त्याची तयारी म्हणून गोवा, गडहिंग्लज, मुंबई, शिरोळ केंद्रावर बैठका घेऊन जनजागृती सुरू केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

संघामध्ये ज्येष्ठ दिवंगत नेते गोविंद पानसरे यांच्या विचाराने काम करणारी संघटना सक्रिय आहे. या संघटनेसोबत व्यवस्थापनाने करार केला असून त्याची मुदत जून २०२६ ला संपत आहे. त्यामध्ये सेवाज्येष्ठता, पात्रता आणि कामाची गुणवत्ता या आधारे पदोन्नती द्या, असे संघटनेचे म्हणणे होते. संचालक मंडळाने त्यास संमतीही दिली परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांना बाजूला करून मर्जीतील ५१ लोकांना पदोन्नती दिली आहे.

संघामध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गृहित धरून त्यानुसार २०१८ मध्ये २०३८ कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित केला आहे. आता १९५० कायम, ४२० रोजंदारीवरील असे २३७० कर्मचारी सेवेत आहेत. निश्चित केलेला पॅटर्न व प्रत्यक्षातील कामगार यांच्यात मोठी तफावत असून ही संघाला मारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शिवाय पदांची मोडतोड केली आहे. गोगवे, तावरेवाडी, शिरोळ चिलिंग सेंटरला कर्मचारी कमी असताना बिद्री, गडहिंग्लजला मात्र जास्त आहेत.

संचालक २५ परंतु कामगार प्रतिनिधी शून्य..?

संचालक मंडळाने राजकीय ताकद वापरून संचालक मंडळाची संख्या वाढवून ती २५ केली, परंतु मंडळावर दोन कामगार प्रतिनिधी घ्यावेत. या मागणीला कायदेशीर आधार असूनही ती धुडकावली आहे. सहकार कायदा कलम ७३ अ अन्वये असे प्रतिनिधी नियुक्त करता येतात. विभागीय उपनिबंधकांनी तशी सूचना देऊनही कामगार प्रतिनिधी नेमलेले नसल्याबद्दल नाराजी आहे.

निवृत्त अधिकाऱ्यांना लाभ..

संघाने अन्य सहकारी संस्थांतून निवृत्त झालेल्या पाच अधिकाऱ्यांना सेवेत घेऊन त्यांना गलेलठ्ठ पगार दिले आहेत. परिणामी संघात सहायक व्यवस्थापक पदावर अनेक वर्षे काम करत असलेल्या लोकांवर अन्याय झाला आहे. निवृत्त झालेल्या लोकांना अन्य सहकारी संस्थात काही हजारांत पगार असताना संघाने मात्र त्यांना दोन-दोन लाख रुपये पगार का दिला आहे, अशी विचारणाही कामगार संघटनेने केली आहे.

Web Title : गोकुल में सुपरवाइजर पदोन्नति पर श्रम अशांति, यूनियन ने उल्लंघन का आरोप लगाया।

Web Summary : कोल्हापुर के गोकुल दूध संघ में कथित तौर पर वरिष्ठता को दरकिनार करते हुए 51 पर्यवेक्षकों को पदोन्नत करने से श्रमिक आक्रोश है। यूनियन ने लंबित मांगों और बाहरी नियुक्तियों पर विरोध प्रदर्शन की धमकी दी है।

Web Title : Gokul Faces Labor Unrest Over Supervisor Promotions, Union Alleges Breach.

Web Summary : Kolhapur's Gokul milk union faces worker backlash for allegedly violating agreement by promoting 51 supervisors disregarding seniority. Union threatens renewed protests over unresolved demands and external hires, citing favoritism.