काळम्मावाडी धरणात ५० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:32+5:302021-04-04T04:25:32+5:30

काळम्मावाडी (ता. राधानगरी ) धरणात आज अखेर ४९.६८ टक्के म्हणजे १२.५३ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा ...

50% water storage in Kalammawadi dam | काळम्मावाडी धरणात ५० टक्के पाणीसाठा

काळम्मावाडी धरणात ५० टक्के पाणीसाठा

काळम्मावाडी (ता. राधानगरी ) धरणात आज अखेर ४९.६८ टक्के म्हणजे १२.५३ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी पाणीसाठा कमी असला तरी दूधगंगा नदी काठावरील गावांना पाणी समस्या भासणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०) टीएमसीने भरले होते. आज धरणाचा पाणीसाठा ४९.६८ टक्के म्हणजे १२.६१ टीएमसी इतका उपलब्ध आहे. गतवर्षी पाणीसाठा ५६.२१ टक्के म्हणजे १४.२७ टीएमसी.

इतका पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असला तरी परिणामी दुधगंगा नदी काठावरील गावांना पाणी समस्या भासणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

आज धरणातून दुधगंगा नदीपात्रात २५० कुसेक्स , उजवा कालवा ४५० कुसेक्स ,तर गैबी ५०० कुसेक्स असे एकूण १२०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे .

पाऊस सुरू होण्यासाठी अजून विलंब असल्याने वेळापत्रकानुसार उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे

फोटो कॅप्शन.... मार्च अखेर काळम्मावाडी धरणात उपलब्ध असणारा ४९.६८ टक्के पाणीसाठा .

Web Title: 50% water storage in Kalammawadi dam