शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग उद्योगावर ५० टक्के वीज दरवाढीचा बोजा

By admin | Updated: December 9, 2014 00:59 IST

वीज प्रतियुनिट चार रुपये ८५ पैसे : प्रतिमाह ७०६ कोटी रुपयांचे अनुदान रद्द झाल्याने दरवाढीची कुऱ्हाड

इचलकरंजी : विजेच्या दरामध्ये साधारणत: २० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असताना यंत्रमाग उद्योगाला प्रत्यक्षात ५० टक्के दरवाढीची वीज बिले लागू झाली आहेत. महावितरण कंपनीला राज्य शासनाकडून दरमहा देण्यात येणारे ७०६ कोटींचे अनुदान बंद केल्याने वीज दरवाढ झाली आहे. व्यावसायिक मंदीच्या संक्रमणातून जात असलेल्या यंत्रमाग उद्योगावर वीज दरवाढीचा बोजा बसल्याने या उद्योगाचे आता कंबरडेच मोडले आहे.सन २०१२-१३ मध्ये वीज उत्पादनात आलेल्या नुकसानीपोटी वीज दरवाढ करण्यास महाराष्ट्र राज्य ऊर्जा नियामक आयोगाने मंजुरी दिली होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचे संकट उभे राहिले होते; पण तत्कालीन कॉँग्रेस आघाडी शासनाने वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू नये म्हणून दरमहा ७०६ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या भाजप सरकारने विजेचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून येणाऱ्या बिलांमध्ये वाढ झाली आहे.नवीन वीज दरवाढ साधारणत: वीस टक्के असेल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र यंत्रमाग उद्योगासाठी प्रतियुनिट असणारा ३ रुपये २५ पैसे दर सध्या देण्यात आलेल्या वीज बिलामध्ये ४ रुपये ८५ पैसे झाला आहे. प्रतियुनिट १ रुपये ६० पैसे प्रमाणे दरवाढीची बिले येथील यंत्रमागधारकांना मिळाल्यामुळे जोरदार खळबळ उडाली आहे. कापड उत्पादनासाठी प्रतिपीक १ पैसा वीज खर्च येत होता. तो आता दीड पैसा इतका येणार आहे. सूतदराच्या अस्थिरतेमुळे यंत्रमाग उद्योग अस्वस्थ आहे. त्यातच कापडाला मागणी नसल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे. त्यातच वीज दरवाढीचा फटका बसल्याने यंत्रमाग उद्योजक हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)पुन्हा रस्त्यावरील लढाई : महाजनइचलकरंजी व परिसरामध्ये असलेल्या यंत्रमाग कारखान्यांना महिन्याला साधारणत: ११ कोटी रुपये वीज बिल येते. त्यामध्ये वाढीव वीज बिलाप्रमाणे सहा ते आठ कोटी रुपये इतकी वाढ होईल. सध्या यंत्रमाग उद्योग हा प्रचंड मंदीत असून, कापडाला ग्राहक नाही. त्यातच वीज बिलाची कुऱ्हाड कोसळली आहे. यातून यंत्रमाग उद्योग वाचायचा असेल, तर पुन्हा अनुदान चालू करण्याची मागणी शासनाकडे करावी लागेल. त्यासाठी यंत्रमागधारकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केले.