CoronaVirus Lockdown : रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:22 IST2020-05-22T19:18:46+5:302020-05-22T19:22:24+5:30

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने शुक्रवारपासून आयोजित रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी ५० पिशव्या रक्ताचे संकलन झाले असून, शनिवारीदेखील हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

50 bags of blood collected on the first day | CoronaVirus Lockdown : रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापुरातील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ५० पिशव्या रक्तसंकलन  मराठी चित्रपट व्यावसायिक समितीचा उपक्रम

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने शुक्रवारपासून आयोजित रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी ५० पिशव्या रक्ताचे संकलन झाले असून, शनिवारीदेखील हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. ती ओळखून कोल्हापुरातील मराठी चित्रपट व्यावसायिकांनी राजारामपुरी सातवी गल्ली येथील जीवनधारा ब्लड बँक येथे शुक्रवारी व शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

पहिल्या दिवशी अभिनेते आनंद काळे, स्वप्निल राजशेखर, विकास पाटील, अजय कुरणे, संजय मोहिते, मिलिंद अष्टेकर, रणजित जाधव, अमर मोरे, सर्जेराव पाटील, देवेंद्र चौगुले यांच्यासह ५० चित्रपट व्यावसायिकांनी रक्तदान केले.

 

Web Title: 50 bags of blood collected on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.