चंद्रकात पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबीयांना ५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:01+5:302021-02-05T06:54:01+5:30
७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संग्राम पाटील यांच्या निगवे खालसा येथील घरी कार्यकर्त्यांसह भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करून ...

चंद्रकात पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबीयांना ५ लाख
७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संग्राम पाटील यांच्या निगवे खालसा येथील घरी कार्यकर्त्यांसह भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करून आधार दिला. यावेळी आई साताबाईए भाऊ संदीप मुलगा शौर्य व मुलगी शिवश्री यांची आस्थेने चौकशी केली
भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी संग्राम पाटील यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा शब्द दिला होता. तो पाळला असून ५ लाखाच्या धनादेशातून आगामी काळात येणारा शैक्षणिक खर्च केला जाणार आहे अशी माहिती दिली. माजी उपसरपंच सुमित चौगले, संभाजी आरडे, मौनी विद्यापीठ संचालक अलकेश कांदळकर, महेश पाटील, विलास रणदिवे, पंचायत समिती सदस्य रमेश चौगले, प्रतापसिंह पाटील (कावणेकर) , माजी सरपंच बी. डी किल्लेदार, जगदीश चौगले, रंगराव तोरस्कर, संभाजी किल्लेदार, तुषार पाटील, विलास कांजर, टी. के. किल्लेदार, अशोक पाटील, महादजी पाटील, सागर कोपार्डेकर, विकास चौगले उपस्थित होते.
फोटो ओळ : निगवे (खालसा) येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी आमदार चंद्रकांत पाटील प्रणित संवेदना फाऊंडेशनच्यावतीने धनादेश देताना माजी आमदार अमल महाडिक, शहीद संग्राम यांच्या पत्नी हेमलता व कुंटुंबीय आणि फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.