शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूचे ५९ रुग्ण बरे

By admin | Updated: November 12, 2014 00:40 IST

महापालिकेचा दावा : ११ जणांवर उपचार सुरू, ८० टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यूची साथ आटोक्यात असल्याचा दावा महापालिका व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने केला. एप्रिलपासून आजपर्यंत ५९ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, सर्व रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. सध्या सीपीआरमध्ये नव्याने डेंग्यूचे ११ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. शहरात सापडलेल्या ४८ रुग्णांपैकी ३५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ६३ प्रभागांत औषध फवारणी पूर्ण केली असल्याची माहिती कीटकनाशक अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.एप्रिल ते आजअखेर ५९ डेंग्यूचे रुग्ण सीपीआरमध्ये दाखल होते. ते सर्व रुग्ण उपचार घेऊन सामान्य जीवन जगत आहेत. नव्याने दाखल झालेल्या ११ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या रुग्णांना तापाची लक्षणे असून, आजार नियंत्रणात असल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात सापडलेल्या ४८ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण ठाणे, चंद्रपूर, पुणे, आदी भागातील आहेत...गवसे येथे डेंग्यूचा रुग्णआजरा : गवसे (ता. आजरा) येथील शालन श्रीरंग पाटील (वय ४०) या विवाहितेस डेंग्यूची लागण झाली असून, त्याबाबत आरोग्य विभागाकडून दुजोरा मिळत आहे. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाकडूनही या वृत्तास दुजोरा मिळत आहे. आजरा शहरातही एका तरुणाला डेंग्यूची लागण झाली असून या तरुणावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. जयसिंगपुरात शाळकरी मुलास डेंग्यूजयसिंगपूर : शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अभिषेक अनिल ताडे (वय १८, रा. मराठा मंडळ शेजारी, जयसिंगपूर) या शाळकरी विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अभिषेकला १५ दिवसांपूर्वी ताप आला होता. तपासणी अहवालात त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी शहरातील राजूल बाफना या बालिकेचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. दरम्यान जयसिंगपूर नगरपालिकेमार्फत शहरातस्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे