शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: शोभा बोंद्रे, आनंद माने यांच्यासह ४८ उमेदवारांनी घेतली माघार, आज होणार चित्र स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:38 IST

आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून गुरुवारी ४८ उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर कोणत्या प्रभागात कशी निवडणूक होणार हे स्पष्ट होणार असले तरी बहुतेक सर्वच प्रभागात बहुरंगी लढती होतील, असे दिसते. महापालिकेसाठी मतदान १५ जानेवारीस, मतमोजणी १६ तारखेला होणार आहे.गुरुवारी माघार घेतलेल्यांमध्ये माजी महापौर शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर, आनंद माने, विश्वजित मोहिते, सूरमंजिरी लाटकर, दिप्ती लिंग्रस, माधुरी मोहिते, महेश उत्तुरे, मुरलीधर जाधव, कस्तुरी खराडे, विक्रम जरग, प्रसाद शेटे, प्रमिला देशमुख, सरोज जाधव, शीतल मुळीक यांच्यासह ४८ उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी माघार घेतलेल्यांमध्ये बहुतांशी डमी अर्ज भरले होते. त्यांच्या नातेवाइकांचे अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांनी माघार घेतली.आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे आज मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे मागे घेतली जातील. या निवडणुकीत किमान ५०० च्या आसपास उमेदवार निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे.माघारीनंतर प्रत्येक प्रभागातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सर्वच मतदार संघात बहुरंगी लढती होणार आहेत.माघार घ्या... ‘अजिंक्यतारा’वरून गेले निरोपकोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या कमी असली तरी ज्या-ज्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरून पक्षासमोर आव्हान उभे केले आहे अशा अपक्षांना माघार घ्या, असे निरोप थेट ‘अजिंक्यतारा’वरून देण्यात आले आहेत. त्यामुळे हे बंडखोर नेत्यांचा आदेश मानणार की मैदानात उतरून पक्षासमोर आव्हान उभे करणार हे आज शुक्रवारी समजणार आहे.महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेसने ७४ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर उद्धवसेनेला ६ जागा देतानाच प्रभाग क्रमांक २० मध्ये मनसेच्या राजू दिंडोर्ले यांना काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असतानाही पक्षाने चार दिवस आधीच आपले उमेदवार घोषित करून त्यांना कामाला लावले होते. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात बंडखोरांनी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र, आमदार पाटील यांनी प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधल्याने या बंडखोरीला बऱ्यापैकी आळा बसला. काहींनी नेत्यांचे न ऐकता अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग क्रमांक ३ सह इतर चार ते पाच प्रभागांमध्ये काही कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बसू नये, यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ‘अजिंक्यतारा’वर ठाण मांडत या बंडखोरांना माघार घेण्याचे निरोप धाडले आहेत. काही बंडखोरांशी चर्चा केल्यानंतर अर्ज माघारी घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: 48 Withdraw, Clarity Today, Multi-Cornered Fights Expected

Web Summary : Kolhapur Municipal Election sees 48 withdrawals, including prominent figures. Clarity emerges today. Multi-cornered fights are anticipated across wards involving BJP, Shiv Sena factions, Congress, NCP groups, AAP, and independents. Congress leaders are trying to persuade rebels to withdraw nominations.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील