शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार विद्यार्थ्यांना मिळाली २५ कोटींची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

कोल्हापूर : विविध नऊ प्रकारांमधील शिष्यवृत्तींच्या माध्यमातून कोल्हापूर विभागातील ४५,२५३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले आहे. त्यांना सन २०१९-२०२० मध्ये ...

कोल्हापूर : विविध नऊ प्रकारांमधील शिष्यवृत्तींच्या माध्यमातून कोल्हापूर विभागातील ४५,२५३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले आहे. त्यांना सन २०१९-२०२० मध्ये एकूण २५ कोटी ३९ लाख ४५ हजार ७८४ इतकी शिष्यवृत्ती मिळाली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण २२७ अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन दाखल केले. या अर्जांची पडताळणी करून परिपूर्ण अर्ज हे कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. अपूर्ण अर्जांतील त्रुटी कळवून ते संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आले. शासनाकडून अर्ज मंजूर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात आली. शिष्यवृत्ती मिळालेले सर्वाधिक ४४४६८ विद्यार्थी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतील आहेत. त्यापाठोपाठ डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती योजनेतील ६०७ विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे सन २०२०-२०२१ मध्ये महाडीबीटी पोर्टल उशिरा सुरू झाले असून, त्यावर आतापर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, एज्युकेशा कसिशा टू द चिल्ड्रा फ्रिडम फायटर, माजी सैनिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ४९ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया -

सध्या महाविद्यालयांचे फी ॲप्रोव्हल देण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालयांची महाडीबीटी पोर्टलची कार्यशाळा घेतली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे परिपूर्ण अर्ज भरणे, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे, विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या वाढविणे, आदींबाबत सूचना महाविद्यालयांना केल्या आहेत.

- डॉ. अशोक उबाळे, विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक

आकडेवारी दृष्टिक्षेपात

योजना विद्यार्थ्यांचे मंजूर अर्ज शासनाने विद्यार्थ्यांना वितरित केलेली रक्कम संस्था पातळीवरून विद्यार्थ्यांनी वितरित झालेली रक्कम

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती ४४४६८ ३,४७,१५,७७५ २१,८२,५६,९८९ असिस्टंट मेरोटिरीअस स्टुडंट स्कॉलरशिप

ज्युनिअर लेवल ५ ११८०० -

सीनिअर लेवल ४ ६६६०० -

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ६०७ ५,१८००० -

एकलव्य स्कॉलरशिप ८२ ३,७२,५०० -

माजी सैनिक शिष्यवृत्ती २४ ६० २५६०

गणित भौतिकशास्त्र शिष्यवृत्ती २ १५०० -

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती ७३ ३७०५० -

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ५१ - -

चौकट

१८१४ अर्ज परत पाठविले

विभागीय कार्यालयाकडून त्रुटी काढून महाविद्यालयांकडे १८१४ विद्यार्थ्यांचे अर्ज परत पाठविले आहेत. त्यात सर्वाधिक १६०४ अर्ज हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांचे आहेत.