शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

४५ ग्रामपंचायती बिनविरोध

By admin | Updated: July 16, 2015 01:01 IST

निर्णायक घडामोडी : उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढती होणार ?

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सुमारे ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ग्रामपंचायतीत स्थानिक गटांतर्गत दुरंगी, तिरंगी व बहुरंगी निवडणुका होणार आहेत. दोन आठवड्यांपासून ग्रामपंचायती निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण तापले असून, बुधवारी माघारीच्या दिवशी निर्णायक घडामोडीत ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी तर करवीर तालुक्यातील वाडीपीर ग्रामपंचायत बिनविरोध झाली. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड, शिराळे तर्फ मलकापूर, नेर्ले, वडगाव, कांडवण, मोळवडे, पेंडागळे, सोनुर्ले या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. पन्हाळा तालुक्यातील वारनूळ, हारपवडे, म्हाळुंगे तर्फ बोरगाव या तीन, तर शिरोळ तालुक्यातील बुबनाळ ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.कागल तालुक्यात अर्जुनी, हळवडे, बेनिक्रे, शंकरवाडी, बेलेवाडी मासा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आजरा तालुक्यातील मलिग्रे, यरंडोळ, चव्हाणवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. राधानगरी तालुक्यात सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. गडहिंग्लज तालुक्यातील मुंगूरवाडी, दुगूनवाडी, इदरगुच्ची, शिंदेवाडी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. भुदरगड तालुक्यातील ४५ ग्रामपंचयातींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी, पाटणे, माळेवाडी, बुक्कीहाळ व मुगळी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. (प्रतिनिधी)बुबनाळ : टोकाच्या राजकीय व जातीय संघर्षासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावाने ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून सर्व अकरा जागांवर महिलांना संधी देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरणाला बळकटी देऊन जातीय व सामाजिक सलोख्याचा नवा संदेश देण्याचे काम बुबनाळ गावाने केले आहे.बुबनाळ हे चार हजार लोकवस्तीचे शिरोळ तालुक्यातील सधन गाव आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. गावात सहकारी पाणीपुरवठा संस्था, सेवा संस्था, पतसंस्था व दूध संस्थेच्या माध्यमातून सहकाराचे जाळे विणलेले. मात्र, येथील सत्तासंघर्ष, राजकीय इर्षा पराकोटीला पोहोचलेला होता. २०१० साली गावाने पहिल्यांदा एकी दाखवत अकरा पैकी दहा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणले होते. एका उमेदवारासाठी निवडणूक लागली होती. मात्र, २०१५च्या पंचवार्षिक निवडणुकीत शंभर टक्के बिनविरोध करण्यात यश मिळवले असून, बुबनाळ गावाचा हा आदर्श जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्शवत ठरला आहे. पुरुषांसाठी पाच जागा असूनदेखील सर्व जागांवर महिलांना संधी देऊन महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सर्व जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.बिनविरोध निवड झालेले उमेदवार - रोहिणी उर्फ सोनाली शहापुरे, त्रिशला कुंभोजे, सुजाता शहापुरे, रोशनबी बैरागदार, पुष्पलता ऐनापुरे, उल्फतबी मकानदार, पूनम कबाडे, अर्चना मालगावे, आसमा जमादार, त्रिशला निडगुंदे, स्नेहल मांजरे. बिनविरोध निवडीसाठी गावातील शरद कारखान्याचे संचालक धनपाल मरजे, जवाहर कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे, सुरेश शहापुरे, राजाराम हेगाण्णा, नाभिराज निडगुंदे, बापूसो ऐनापुरे, धरणेंद्रकुमार मरजे, सरपंच विद्याधर मरजे, सुभाष किनिंगे, नाभिराज मरजे, अजित शहापुरे, कलंदर मकानदार, संजय मांजरे, शब्बीर मकानदार, जगन्नाथ जाधव, सुभाष शहापुरे, धनपाल कबाडे, सुरेश मरजे, गौतम किनिंगे, पवन मरजे, संजय केरिपाळे यांचे विशेष प्रयत्न लाभले. बिनविरोध निवडीनंतर मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालय आवारात नूतन सदस्यांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.