शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ हजार पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ हजार ८०६ जणांचा कडक बंदोबस्त गावागावात नेमला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात १,१०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून भयमुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी गावे, मतदान केंद्रे, संवेदनशील गावे, मतदान केंद्रे आदींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईसाठी १५१ (३) व १४४नुसार ९३ प्रस्तावानुसार लोकांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. साडेचारशे लीटर दारुही जप्त केली आहे. दारुबंदी अंतर्गत ११६ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ९४२ परवानाधारकांची शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

असा असेल फौजफाटा...

पोलीस अधीक्षक -०१

अतिरिक्त पोलीस अधीक्षक-०२

परिक्षेत्रीय पोलीस अधीक्षक - ०१

उपअधीक्षक - ०६

पोलीस निरीक्षक - २२

सहायक व पोलीस उपनिरीक्षक - ७८

पोलीस अंमलदार - २३०६ (पुणे शहर पोलीस दलातील १५० व लोहमार्ग पोलीस मुंबईतील ५० अंमलदार)

गृहरक्षक दलाचे जवान - १४०७

एसआरपीएफची कंपनी - ०१

चौकट

संवेदनशील गावात बंदोबस्त

अतिसंवेदनशील गावासह ८८ गावांची यादी करण्यात आली आहे. या गावांमध्ये एक अधिकारी व दहा कर्मचारी असा विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या गावांमध्ये उपअधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनी अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे वाटपासारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचेही आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.