शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Kolhapur: ‘गोकुळ’च्या पशुखाद्य कारखान्यात ३५ लाखांचा अपहार, संचालक मंडळात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 12:52 PM

वाहतूक अंतर वाढवून यंत्रणेकडून गंडा : पैसे भरून प्रकरण दडपण्यासाठी धडपड

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पशुखाद्य कारखान्यात वाहतुकीचे अंतर वाढवून सुमारे ३५ लाखांचा अपहार झाला आहे. ही वाहतूक संस्था संघातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याशी संबंधित असून अपहाराचे प्रकरण बाहेर आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, एका कर्मचाऱ्यावर हे प्रकरण लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते उफाळून आले. हे प्रकरण फार ताणू नये, यासाठी पैसे भरण्यासाठी बुधवारी धांदल सुरू झाली होती.‘गोकुळ’च्या गडमुडशिंगी पशुखाद्य कारखान्यातून दूध संस्थांना वेगवेगळ्या वाहतूक संस्थांच्या माध्यमातून पशुखाद्याचा पुरवठा केला जातो. या संस्थेकडून विविध गावांतील दूध संस्थांना पशुखाद्याचा पुरवठा होतो. मात्र, प्रत्यक्षातील वाहतुकीचे अंतर व खर्ची टाकलेले अंतर यांमध्ये तफावत आढळली आहे. गेली अनेक महिने अशा प्रकारे वाहतूक यंत्रणेकडून लूट सुरू होती. अशा प्रकारे अंतर वाढवून सुमारे ३५ लाखांची लूट केल्याचे उघड झाले आहे.हे प्रकरण उघड होताच, दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरून सगळा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. खऱ्या मास्टरमाइंडला बाजूला करून कर्मचाऱ्यांवर प्रकरण ढकलल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांतील एका कर्मचाऱ्याने तर आत्महत्येची धमकी दिल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी धडपड सुरू केली. पैसे भरतो; पण या प्रकरणाची वाच्यता कोठे करू नका, असा त्यांचा प्रयत्न आहे. बुधवारी वाहतूक संस्थेच्या नावाचा संबंधित रकमेचा धनादेश देण्यासाठी जुळवाजुळव सुरू होती.

या विभागातील कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी असल्याने त्यांना चांगलीच मुळे सुटली आहेत. एका अधिकाऱ्याने तर कोकणात शेकडो जमीन खरेदी केली असून, त्यांना पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने अशा अपहारांना खतपाणी मिळत आहे.कच्चा माल खरेदीची तपासणी होणार का?पशुखाद्य विभागात वाहतुकीमध्ये झालेला अपहार फार छोटा आहे. संघ व्यवस्थापनाने डोळे उघडून तपासणी केली तर हलक्या दर्जाचा कच्च्या मालाच्या आडून कशा पद्धतीने लुटले जाते, हे उघड होईल. तो घोटाळा यापेक्षा मोठा असेल, अशी चर्चा संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

संचालक मंडळात अस्वस्थताएकूणच कामकाजाबाबत संचालक मंडळात अस्वस्थता दिसते. नेत्यांना घाबरून काही संचालक तोंड उघडत नाहीत. आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा सपाटा गेल्या दोन-तीन महिन्यांत सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांसह संचालकांची अस्वस्थता वाढली आहे.

पशुखाद्य विभागातील अपहाराबाबत अद्याप मला काही माहिती नाही. मी प्रशिक्षणासाठी बाहेर आहे. - योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, गोकुळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळfraudधोकेबाजी