Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:59 IST2025-05-26T12:58:56+5:302025-05-26T12:59:44+5:30

लवकरच होणार हद्दवाढ

35 Congress corporators will join Shinde Sena MLA Rajesh Kshirsagar gave information | Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर 

Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर : काँग्रेसचे दहा नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार असल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. रविवारी दुपारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, पुढच्याच महिन्यात काही प्रवेश होणार असून, टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्रे डागून विरोधकांचे तळ उद्ध्वस्त केले जातील. लवकरच कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होणार, असाही दावा त्यांनी यावेळी केला.

क्षीरसागर म्हणाले, आम्ही महापालिका महायुती म्हणून लढणार आहोत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर नेता आमच्या पाठीशी असल्याने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर करून दाखविणार आहोत. हद्दवाढ नाही झाली तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असे सत्यजीत कदम म्हणाले होते. याबाबत विचारणा केली असता, क्षीरसागर म्हणाले, बहिष्कार टाकणे मी उचित समजत नाही. मात्र, हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊ नये हे माझेही मत आहे. मी राज्य शासनासोबत प्रत्येक ठिकाणी हद्दवाढीच्या बाबतीत आग्रही मागणी करीत आलो आहे. एकूणच वरिष्ठ पातळीवरील हालचाली पाहता, लवकरच हद्दवाढ होईल, असा मला विश्वास आहे.

कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत उत्तरे देत असतानाच क्षीरसागर म्हणाले, की महापुरासारखी समस्या निर्माण होत असताना मी २०१ १ साली ‘रेड झोन’च्या मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी रेड झोनमध्ये कोणतीही बांधकामे होणार नाहीत असे जाहीर केले होते. परंतु इथल्या स्थानिक नेत्याने स्वतचे रुग्णालय आणि हॉटेल वाचविण्यासाठी ब्ल्यू लाईनचाही घोळ घातला आहे, हे विसरून चालणार नाही. आपली सोय करताना इतरांना दाणीला द्यायचं अशी त्यांची वृत्ती आहे. सत्तेचा फायदा घ्यावा, त्याविषयी आमचे दुमत नाही. परंतु इथेतर गैरफायदाच अधिक घेतला गेला. टीडीआर घोटाळा, घरफाळा घोटाळा हे घोटाळे महापालिकेत झालेले आहेत.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळाेखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर यांच्यासह माजी नगरसेवक राजू हंबुे, अजित मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: 35 Congress corporators will join Shinde Sena MLA Rajesh Kshirsagar gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.