दिवसभरात नवे ३० कोरोना रुग्ण, एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:16+5:302021-03-08T04:24:16+5:30

कोल्हापूर : गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाचे सुमारे ३० नवे रुग्ण आढळले असले, तरीही तब्बल ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने ...

30 new corona patients in a day, no deaths | दिवसभरात नवे ३० कोरोना रुग्ण, एकही मृत्यू नाही

दिवसभरात नवे ३० कोरोना रुग्ण, एकही मृत्यू नाही

कोल्हापूर : गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाचे सुमारे ३० नवे रुग्ण आढळले असले, तरीही तब्बल ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठविले. दिवसभरात कोरोनाचा एकही बळी गेला नसल्याची समाधानकारक बाब आहे.

कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे. सद्या बाजारपेठा, मॉल, प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते. त्यावरून नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्यासारखी अवस्था झाली आहे; परिणामी कोरोना पुन्हा तोंड वर काढत आहे. हळूहळू वाढत्या कोरोनामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. रविवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३० रुग्ण दाखल झाले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील १७, तर करवीर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय भुदरगड, हातकणंगले, कागल या तालुक्यांतील प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला. दिवसभरात ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तर त्यामुळे कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या ५०,६६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोना बळींची संख्या १७४६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सद्या ३६१ कोरोना रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: 30 new corona patients in a day, no deaths