शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

परवडणाऱ्या घरांसाठी कोल्हापुरात २५० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 4:59 PM

संतोष मिठारी कोल्हापूर : विविध ठिकाणी होणाऱ्या सात प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात दोन हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. त्यात ...

ठळक मुद्देपरवडणाऱ्या घरांसाठी कोल्हापुरात २५० कोटींची गुंतवणूकशहरात सात प्रकल्प साकारणार; दोन हजार घरांचा समावेश

संतोष मिठारीकोल्हापूर : विविध ठिकाणी होणाऱ्या सात प्रकल्पांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात दोन हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. त्यात महानगरपालिकेचा एक आणि खासगी विकसकांचे सहा प्रकल्प आहेत; त्यासाठी सुमारे २५० कोटींची गुंतवणूक होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) परवडणाऱ्या घरांसाठी एक टक्का वस्तू व सेवाकर (जीएसटी), एक हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी, सेस आणि नोंदणी शुल्क प्रत्येकी एक टक्का, अडीच लाखांचे अनुदान अशा सवलती आहेत; त्यामुळे खासगी नोकरदार, रिक्षा व्यावसायिक, भाजी विक्रेते, छोटे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांसह मध्यमवर्गीय कुटुंबे, त्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी उत्सुक आहेत. ते लक्षात घेऊन विकसक, बांधकाम व्यावसायिकांनी परवडणारी घरे साकारणाऱ्या प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे.

कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क, कदमवाडी, पुईखडी, आपटेनगर या ठिकाणी प्रत्येकी एक आणि कसबा बावडा परिसरात दोन खासगी प्रकल्प, तर आपटेनगर ते साळोखेनगरदरम्यान असलेल्या श्रीराम कॉलनीलगतच्या रि. स. नं. १००९ / अ येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या दोन एकर जागेत २३४ घरांचा एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पातील ४५० चौरस फुटांच्या वन बीएचके सदनिकेची किंमत साधारण ११ लाख २० हजार आहे. अडीच लाखांचे अनुदान वगळता एक सदनिका आठ लाख ७० हजार रुपयांना लाभार्थ्यांना मिळेल. नागाळा पार्क आणि पुईखडी परिसरातील प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. अन्य प्रकल्पांची काही परवानगीची कामे सुरू आहेत.महानगरपालिकेच्या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. खासगी प्रकल्पांमध्ये २00 जणांनी नोंदणी केली आहे. महापुरामुळे बांधकाम क्षेत्रातील थोडी थांबलेली हालचाल पुन्हा सुरू झाली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गृहस्वप्न साकारण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून पुन्हा प्रकल्पांची माहिती घेण्यात येत आहे.

महानगरपालिकेचा ३६८४ घरांचा प्रस्तावपरवडणाऱ्या घरांसाठी महानगरपालिकेकडे १९,७४४ नागरिकांचे प्रस्ताव, अर्ज दाखल झाले. त्यापैकी ३६८४ प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यात वैयक्तिक स्वरूपातील घरबांधणी ४५० तर, खासगी भागीदारीतून विविध तीन प्रकल्पांद्वारे ३२३४ इतकी घरबांधणी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील पहिला प्रकल्प २३४ घरांचा, दुसरा १२०० आणि तिसरा १८०० घरांचा असल्याचे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यकारी अभियंता सुधीर माने यांनी सांगितले.

आपटेनगर ते साळोखेनगर परिसरातील २३४ घरांच्या प्रकल्पासाठी तीनवेळा निविदा प्रसिद्ध केली; पण त्याला विकसकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. आता त्याबाबत ‘क्रिडाई कोल्हापूर’समवेत चर्चा सुरू आहे. संभाजीनगर परिसरातील कामगार चाळ आणि ताराराणी चौकातील महापालिकेच्या जागेवर परवडणाºया घरांचा प्रकल्प साकारण्यासाठी आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये चांगले मार्केटकोल्हापूरमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी चांगले मार्केट आहे. ४६ हजार घरांची गरज आहे. सध्या सात प्रकल्पांतर्गत दोन हजार घरे साकारणार आहेत. या घरांची गरज लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिक, विकसकांनी काम सुरू केले आहे; मात्र त्याला अपेक्षित असे सहकार्य शासनाकडून मिळत नाही. परवडणारी घरे साकारणाऱ्या व्यावसायिक, विकसकांना बांधकाम परवाना कमी वेळेत मिळण्याची यंत्रणा शासनाने उभारावी.

महानगरपालिकेने स्वतंत्र कक्ष सुुरू करावा, अशी मागणी ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी केली. विविध सवलती, कर्जपुरवठ्याबाबत बँकांनी सकारात्मक असल्याने ग्राहकांना त्यांचे गृहस्वप्न साकारण्याची सध्या चांगली संधी आहे. महानगरपालिकेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव ‘क्रिडाई कोल्हापूर’कडे आला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे बेडेकर यांनी सांगितले.

परवडणाऱ्या घरांबाबतची आकडेवारी दृष्टिक्षेपात

  •  कोल्हापूर जिल्ह्यातील घरांची मागणी ४६,९००
  • महापालिका क्षेत्रातील घरांची मागणी : २५,१४४
  •  ‘पीएमएवाय’ मंजूर प्रकल्प : ७
  • बांधकाम सुरू असलेले प्रकल्प : २
  • उपलब्ध होणारी घरे : दोन हजार
  • घरांच्या किमती : वन बीएचके : किमान ११ लाख ते १९ लाख
  • टू बीएचके : किमान २१ लाख ते २८ लाख

 

 

टॅग्स :Homeघरkolhapurकोल्हापूर