कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:32 IST2026-03-27T16:32:02+5:302026-03-27T16:32:27+5:30

तातडीने हजर राहण्याचे आदेश

27 police officers transferred in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले

संग्रहित छाया

कोल्हापूर : जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंती आणि प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यात १२ पोलिस निरीक्षकांसह १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी (दि.२५) रात्री बदल्यांचा आदेश जारी केला.

एकाच पोलिस ठाण्यात कालावधी पूर्ण झालेले, जिल्ह्यात नव्याने बदली होऊन आलेले आणि विनंती केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांची सायबर पोलिस ठाणे, राजेंद्र सावंत्रे यांची शाहूवाडी, अजित सिद यांची पोलिस कल्याण उपक्रम, नामदेव शिंदे यांची विमानतळ सुरक्षा येथे बदली झाली. सतीश होडगर यांची राजारामपुरीत, तर रवींद्र कळमकर यांची नियंत्रण कक्षात बदली झाली.

सत्यवान हाके यांची जयसिंगपूर येथून हुपरी, सचिन सूर्यवंशी यांची शहापूर येथून राधानगरी, गजेेंद्र लोहार यांची जिल्हा विशेष शाखेतून शहापूर, निगाप्पा चौखंडे यांची हुपरी येथून चंदगड, संतोष गोरे यांची राधानगरी येथून जयसिंंगपूर, विश्वास पाटील यांची चंदगड येथून जिल्हा विशेष शाखेकडे बदली झाली.

सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांची आजरा येथून शिवाजीनगर, शीतलकुमार कोल्हाळ यांची अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षातून शिवाजीनगर, कैलास कोडग कोडोलीतून इस्पुर्ली, क्रांती पाटील इस्पुर्लीतून मुरगूड, शिवाजी करे मुरगूडहून करवीर, रविराज फडणीस वाचक शाखेतून कोडोली, तब्बसुम मगदूम गोकुळ शिरगावहून शाहूपुरी, अतुल कदम नियंत्रण कक्षातून नेसरी, बाबासाहेब सरवदे करवीरहून आजरा,

भारत साळुंखे राजारामपुरीतून गगनबावडा, चेतन मसुटगे नेसरीतून गोकुळ शिरगाव, धोंडीराम वाळवेकर नियंत्रण कक्षातून वाचक शाखा, रितल पुरळे शिवाजीनगरहून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष, मुद्दस्सर शेख यांची शाहूपुरीतून नियंत्रण कक्षात बदली झाली. पोलिस उपनिरीक्षक मृणालिनी कलगोंडा पाटील यांची नियंत्रण कक्षाकडून इचलकरंजी पोलिस ठाण्यात बदली झाली.

तातडीने हजर राहण्याचे आदेश

कोडोलीचे सपोनि कैलास कोडग हे जोतिबाच्या चैत्र यात्रा बंदोबस्तात आहेत. बंदोबस्त संपल्यानंतर ते इस्पुर्लीचा कार्यभार घेतील. तोपर्यंत क्रांती पाटील यांच्याकडे इस्पुर्लीचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. बदली झालेल्या इतर अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: 27 police officers transferred in Kolhapur district