उत्तूर जवळ टेम्पो-एसटीच्या अपघातात २७ जण जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 19:37 IST2022-12-22T19:37:31+5:302022-12-22T19:37:54+5:30
अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

उत्तूर जवळ टेम्पो-एसटीच्या अपघातात २७ जण जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
उत्तूर : उत्तूर - गडहिंग्लज रस्त्यावर टेम्पो व एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात २७ जण जखमी झाले. आज, गुरुवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गारगोटी आगाराची बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३२३) गडहिंग्लज कडून गारगोटीकडे जात होती. टेम्पो क्रमांक (एम एच ११ सी एच २४६१) निपाणी कडे निघाला होता. दरम्यान रस्त्यावर टेम्पो वेगात पलटी झाला. अपघात टाळण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. यात २७ जण जखमी झाले.
जखमी रुग्णांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यापैकी नऊ प्रवाशांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. एसटीचेही मोठे नुकसान झाले.