शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा जप्त, देणारा अन् घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:10 IST

बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता 

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात बनावट नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. १६) दुपारी अटक केली. राहुल प्रकाश किरुगडे (वय ३३, सध्या रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, मूळ रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर) आणि गुरू राजेंद्र मेंगाणे (२३,रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या नोटा एक लाख ३१ हजार रुपये किमतीच्या आहेत. त्यांच्या चौकशीतून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.एक तरुण बनावट नोटांची विक्री करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने सोमवारी दुपारी रेल्वे स्टेशनबाहेर रिकाम्या जागेत सापळा रचून नोटा देणारा राहुल किरुगडे आणि नोटा घेणारा गुरू मेंगाणे या दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत किरूगडे याच्याकडे ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा मिळाल्या.किरूगडे याने कोणाकडून नोटा आणल्या? तो कधीपासून हे काम करत आहे? त्याने किती नोटा खपवल्या? कोणाला खपवल्या? या कामात त्याला आणखी कोणाची मदत झाली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर केले जाईल. अंमलदार मिलिंद बांगर, रवी आंबेकर, कृष्णा पाटील, महेश पाटील, गौरव शिंदे, बाबा ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, आदींच्या पथकाने कारवाई केली.

रॅकेटची व्याप्ती मोठी?पोलिसांच्या अटकेतील किरुगडे हा रंगकाम करतो, तर मेंगाणे हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. ते स्वत: बनावट नोटा छापण्याची शक्यता कमी आहे. त्यांना नोटा पुरवणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर बनावट नोटा कोणी छापल्या? किती छापल्या? कुठे छापल्या? त्या कुठे कुठे खपवल्या? याचा उलगडा होणार आहे.

दोघांच्या घरांची झडतीपोलिसांनी तातडीने अटकेतील किरूगडे याच्या पाडळी खुर्द येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. त्यानंतर गजबरवाडी येथे जाऊन मेंगाणेच्या घराची झडती घेतली. दोघांच्याही घरात विशेष काही मिळाले नाही. दोघांचे मोबाइल जप्त केले आहेत. कॉल डिटेल्सवरून महत्त्वाची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

५० हजारांत दीड लाखाच्या बनावट नोटाअटकेतील किरुगडे हा ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा घेऊन त्याबदल्यात दीड लाखाच्या बनावट नोटा देत होता. मेंगाणे याला एका मित्राकडून याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मोबाइलवर संपर्क साधून तो बनावट नोटा घेण्यासाठी आला होता.

या कलमांनुसार गुन्हा दाखलअटकेतील दोघांवर भारतीय न्यायसंहिता कलम १७८, १७९ आणि १८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपींना सात वर्षांपासून आजीव कारावासाची शिक्षा होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Fake currency racket busted, two arrested with ₹1.31L.

Web Summary : Kolhapur police arrested two men dealing in counterfeit ₹500 notes worth ₹1.31 lakh. Rahul Kirugade and Guru Mengane were caught near the railway station. Police suspect a larger racket and are investigating the source and distribution network.