Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेला २३ लाख मतदारांना मतदानाचा हक्क, सर्वाधिक मतदार कोणत्या तालुक्यात...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:49 IST2026-01-14T12:48:29+5:302026-01-14T12:49:02+5:30
जिल्हा परिषदेला मात्र पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा जास्त

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेला २३ लाख मतदारांना मतदानाचा हक्क, सर्वाधिक मतदार कोणत्या तालुक्यात...वाचा
कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील २३ लाख ४० हजार १९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ११ लाख ८७ हजार २०३ पुरुष तर ११ लाख ५२ हजार ९०९ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ८ हजार १७४ मतदार हे करवीर तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी मतदार गगनबावड्यात आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल मंगळवारी वाजल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगरपालिका, महापालिका निवडणुकीला महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त हाेती. जिल्हा परिषदेला मात्र पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा ३४ हजार २९४ ने जास्त आहे.
वाचा : तब्बल पावणेनऊ वर्षांनी गावागावांत ‘झेडपी’चा धुरळा; इच्छुक लागले कामाला
मतदान केंद्र २ हजार ६९१
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ हजार ६९१ मतदान केंद्र निश्चित जाली असून त्यासाठी ६८ निवडणूक विभाग कार्यरत असतील. गण संख्या एकूण १३६ आहे.
तालुका : मतदान केंद्र : पुरुष : स्त्री : इतर : एकूण मतदार
करवीर : ४१७ : २०८५८० : १९९५५९ : ३५ : ४०८१७४
हातकणंगले : ३५५ : १८०६३५ : १७५०४७ : २० : ३५५७०२
शिरोळ : २३२ : ११९२७२ : १२०८२८ : २ : २४०१०२
पन्हाळा : २५४ : ११२३५८ : १०५९७६ : ७ : २१८३४१
कागल : २३१ : १०१२५५ : ९९४३७ : २ : २००६९४
राधानगरी : २२३ : ९०८६० : ८३४९२ : ७ : १७४३५९
गडहिंग्लज : २०६ : ८४७४९ : ८६७९१ : ९ : १७१५४९
शाहुवाडी : २०९ : ८१८९६ : ७७२२७ : ० : १५९१२३
चंदगड : २११ : ७७३५७ : ७५७९१ : ० : १५३१४८
भुदरगड : १८० : ६८०५२ : ६५४१७ : ५ : १३३४७४
आजरा : १२७ : ४७०१५ : ४९५९६ : ० : ९६६११
गगनबावडा : ४६ : १५१७४ : १३७४८ : ० : २८९२२
एकूण : २ हजार ६९१ : ११ लाख ८७ हजार २०३ : ११ लाख ५२ हजार ९०९ : ८७ : २३ लाख ४० हजार १९९