शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

corona virus : सीपीआरमध्ये २० हजार लिटरची ऑक्सिजन टाकी बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:16 PM

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये २० हजार लिटरची ऑक्सिजन टाकी बसवणारदोन दिवसांत कार्यवाही : अत्यवस्थ ४०० रुग्णांची होणार सोय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सोमवारी ही टाकी चेन्नई येथून आणण्यात आली असून पुढच्या दोन दिवसांत ती कार्यान्वित केली जाणार आहे. ही टाकी बसविल्यानंतर एकाच वेळी ३५० ते ४०० रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय होणार आहे.सध्या सीपीआरमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून रुग्ण दगावण्याचे काही प्रकार घडले आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नईतील कंपनीशी फोनवर चर्चा करून २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी खरेदी केली. ही टाकी सोमवारी सीपीआर रुग्णालयाच्या आवारात पोहोचली.

टाकी कुठे बसवायची याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याठिकाणी ब्लॉक, कॉक्रिटीकरण केले जात आहे. खरेदी केलेली टाकी लिक्विड ऑक्सिजनची आहे. २० हजार लिटर क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन टाकीतून सलग दीड ते दोन दिवस ४०० रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो.

सध्या सीपीआर रुग्णालयात विविध वार्डात २७५ रुग्णांच्या बेडजवळ ऑक्सिजन पुरविण्याकरिता पाईपलाईन जोडलेली असल्याने टाकी जेव्हा दोन-तीन दिवसांत कार्यान्वित केली जाईल तेव्हा तत्काळ २७५ रुग्णांची ऑक्सिजनची सोय होईल.

उर्वरित वॉर्डना पाईपलाईन कनेक्शन जोडण्याचे काम करावे लागणार असल्याने पुढील दहा दिवसांत तेही काम पूर्ण होईल. जेव्हा ही टाकी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हा एकाच वेळी ३५० ते ४०० रुग्णांना त्यांच्या बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरविला जाईल.या टाकीसाठी लागणारे लिक्विड सध्या तरी कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीस पुण्यातील एका कंपनीकडून खरेदी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर निविदा काढून कायमस्वरूपी पुरवठादार नेमण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या टाकीमुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

  • टाकीची क्षमता - २० हजार लिटर
  • ३५० ते ४०० रुग्णांना एकावेळी ऑक्सिजन देणे सोयीचे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर