शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’मधील १८८ कर्मचारी उद्यापासून घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील १८८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय नूतन संचालक मंडळाने घेतला असून उद्या, मंगळवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील १८८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय नूतन संचालक मंडळाने घेतला असून उद्या, मंगळवारपासून त्यांना थांबावे लागणार आहे. यासह तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, अजूनही काही कर्मचारी रडारवर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी दुपारी एक वाजता दूध प्रकल्प येथे नूतन संचालक मंडळाची पहिली बैठक होत आहे.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकूणच कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न नूतन संचालक मंडळाने सुरू केला आहे. वाहतूक खर्चात कपात करण्याबरोबरच कामावर न येता पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली. तब्बल दोनशे कर्मचारी पगार ‘गोकुळ’चा आणि काम संचालकांच्या घरात करत होते. त्या सगळ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांशी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी भरती केलेल्या १८८ रोजंदारी कर्मचाऱ्यावरांवर गंडातर आले आहे. त्यांना उद्या, मंगळवारपासून कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तीन माजी संचालकांचे कर्मचारी रडारवर

एका नेत्याला मानणाऱ्या माजी ज्येष्ठ संचालकांचे कर्मचारी विद्यमान संचालकांच्या रडारवर आहेत. लोकसभा, विधानसभेसह ‘गोकुळ’च्या निवडणुकीत प्रचारात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार असून, येत्या आठ-दहा दिवसांत त्यांच्या बदल्या होणार हे निश्चित आहे.

राजकीय शह-काटशहाचे राजकारण

विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांना अध्यक्षपदावरून गेल्यानंतर त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्याच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. सत्तेत असूनही काहीच करता न आल्याचे शल्य त्यांना बोचत होते. त्यामुळे आता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी आणण्यास सुरुवात केली आहे.

कोट-

कर्मचाऱ्यांच्या बदल्या ही प्रशासकीय बाब आहेे, त्यामध्ये कोणाच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही. जिथे कर्मचारी नाहीत, त्याठिकाणी कोणालातरी काम दिलेच पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर रोजंदारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आले, आता कायम कर्मचाऱ्यांना काम नसल्याने त्यांना कमी करावे लागले.

- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)