नोकरीच्या आमिषाने १.४३ कोटींचा गंडा, नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे दिली खोटी; कोल्हापूर, सांगलीतील २७ तरुणांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:11 IST2022-12-14T12:10:37+5:302022-12-14T12:11:03+5:30
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नोकरीच्या आमिषाने १.४३ कोटींचा गंडा, नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे दिली खोटी; कोल्हापूर, सांगलीतील २७ तरुणांची फसवणूक
कुरुंदवाड : रेल्वे, आयकर व भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून खोटी नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देऊन २७ जणांची १ कोटी ४३ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी ४ एप्रिल २०२१ ते २२ जुलै २०२२ या काळात रेल्वे खात्यात, आयकर विभागात व भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून क्रांतीकुमार पाटील (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), मोहम्मद कामील अब्दुल गफार ( सध्या रा. कुर्ला मुंबई, मुळगाव नुरी मशीद जवळ, जाफर नगर नागपूर), अनिसखान गुलाम रसूलखान ( काटोल रोड नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (कोलकत्ता), सुबोध कुमार (कोलकत्ता) यांनी वेगवेगळ्या भागातील २७ जणांना बोगस नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे देऊन १ कोटी ४३ लाखाची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्हयासह दिल्ली येथील तरुणांचा समावेश आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.
कुटुंबे आर्थिक व मानसिक तणावाखाली
फसवणूक झालेल्या अनेक तरुणांच्या पालकांनी शेती, सोने गहाण ठेवून तर काहींनी कर्जे काढून नोकरीसाठी पैसे दिले आहेत. मात्र नोकरीही नाही आणि पैसेही गेल्याने अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक ताणतणाव आहेत.
फसवणूक झालेल्या तरुणांची नावे
रोहीत कोळी राजापुरवाडी ता. शिरोळ, अरुण महेश खरपे (कुरुंदवाड ता. शिरोळ), संतोष संभाजी पाटोळे (कवठेमहांकाळ, जि. सांगली), रजत बाळकृष्ण लंबे ( राजापुर ता. शिरोळ), शंतून बाळनाथ रावळ निगवे दुमाला, कोल्हापुर), नितीन विलास शिंदे (रा. आष्टा जि. सांगली), सुयोग रमेश माने (रा. सोनारवाडी ता. भुदरगड), साईनाथ पांडुरंग धोंड ( रा. खालाचीवाडी शेनोली ), पवन सर्जेराव पाटील (रा. पाटेकर वाडी), सुरज पांडुरंग खडके (रा. मुगळी ता. गडहिंग्लज), निरंज अशोक देसाई (रा. नेंगरूळ), रमेश पांडुरंग पोवार (रा. मुगळी ता गडहिंग्लज), सुनिल लक्ष्मण तुरके (रा लिंगनूर, सांगली), अभिजीत बाबुराव तोड़कर (रा. लिंगनूर), अक्षय अशोक शिंदे (रा नागठाणे ),
सुनिल दादासाहेब पाटील (रा. म्हैशाळ), राजु भाऊसाहेब शिंदे (रा. तावशी ता. अथणी), तेजस रावसाहेब पाटील (रा. खुजगाव, सांगली ), किरण राजाराम जाधव (रा. वडीये ता. कडेगाव), किरण राजाराम जाधव (रा. वडीये ता. कडेगाव), आकाश व अभिषेक करडे (रा. कुरूंदवाड), अरविंद चंद्रकांत गावडे (रा. राजापुरवाडी ), दिपक रामप्रसाद (रा. छत्तरपुर दिल्ली), जितेश कुमार (रा. छत्तरपुर, दिल्ली), ब्रजगोपाल (रा. छत्तरपुर दिल्ली ), शिवाजगत नारायण (रा. छत्तरपुर दिल्ली), जयेश कांबळे (रा. मंबई), सुरज बदामे (रा. टाकळीवाडी ता. शिरोळ)