इचलकरंजी - इचलकरंजी येथील स्वामी मळ्यात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. त्यामध्ये 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सना पठाण असे मुलीचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाक्यावरील स्वामी मळा परिसरात सना पठाण ही मुलगी दारात खेळत होती. त्यावेळी तेथे असलेल्या फुगे फुगवण्याच्या गॅस सिंलिडरचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये सना ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने आयजीएम रुग्णालयात नेले. त्यावेळी सनाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय निकामी झाले होते. तिला प्राथमिक उपचार करून तातडीने कोल्हापूरला हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.