ब्राह्मण सभेच्या १ कोटी ९ लाखांच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST2021-02-21T04:46:25+5:302021-02-21T04:46:25+5:30

कोल्हापूर : मंगल धाम वास्तू आणि भक्त निवास या दोन्ही संस्था सुविधायुक्त करूनही ब्राह्मण सभेने १ कोटी ९ लाख ...

1 crore 9 lakh deposits of Brahmin Sabha | ब्राह्मण सभेच्या १ कोटी ९ लाखांच्या ठेवी

ब्राह्मण सभेच्या १ कोटी ९ लाखांच्या ठेवी

कोल्हापूर : मंगल धाम वास्तू आणि भक्त निवास या दोन्ही संस्था सुविधायुक्त करूनही ब्राह्मण सभेने १ कोटी ९ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीराम धर्माधिकारी यांनी दिली.

संस्थेच्या ७७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. संस्था कार्यालयामध्ये कोरोनाविषयक सर्व नियम पाळून ही सभा घेण्यात आली.

सुरुवातील संस्थेचे संचालक ॲड. विवेक शुक्ल यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यवाही श्रीकांत लिमये यांनी नोटीस वाचन केल्यानंतर सर्व विषय सभासदांनी मंजूर केले. हिशेब पत्रकातील प्रश्नांना खजिनदार रामचंदर टोपकर यांनी उत्तरे दिली. ज्येष्ठ सभासद भालचंदर आष्टेकर, एस. के. कुलकर्णी, विनोद डिग्रजकर, बाबा वाघापूरकर, हेमंत आराध्ये, महेश धर्माधिकारी, केदार हसबनीस, रमेश सखदेव आदींनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. संचालक डॉ. दीपक आंबार्डेकर यांनी आभार मानले.

यावेळी उपाध्यक्ष संतोष कोडोलीकर, सहकार्यवाह किरण धर्माधिकारी, सतीश कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, डॉ. उदय कुलकर्णी, अनुराधा गोसावी, वृषाली कुलकर्णी, व्यवस्थापक अशोक जोशी, नांगनूरकर, भुयेकर उपस्थित होते.

Web Title: 1 crore 9 lakh deposits of Brahmin Sabha