Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:04 IST2021-08-29T17:04:13+5:302021-08-29T17:04:52+5:30
रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे.

Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले
भाजप आणि मनसे यांची युती होणो अशक्य आहे. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसेची भूमिका मराठीची आहे. त्यामुळे अशी एकल भूमिका घेणे भाजपला परवडणार नाही. रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपाई निवडणूक लढविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली आहे.
कल्याण पूर्व भागातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त केंद्रीय मंत्री आठवले हे उपस्थित होते. काशीश हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मश्री कल्पना सरोज, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आठवले यांनी उपरोक्त माहिती दिली. आठवले यांनी सांगितले की, कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकीत भाजप आणि रिपाई सोबत निवडणूका लढविणार आहे. त्यावेळी भाजपकडे रिपाई काही जागा मागणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी भाजप शिवसेना पुन्हा एकत्रित येऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. नारायण राणो आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा प्रकारचे वाद करुन चालणार नाही. नारायण राणो हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी राज्यातील सत्तेने सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणो अयोग्य आहे. शिवसेनाही अशी वक्तवे करीत असते. राणो हे शिवसेनेत होते. त्यामुळे त्यांची भाषा तशी आहे. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणो अनावश्यक होते. केंद्र आणि राज्याकडून येणा:या पैशातून राज्याचा विकास केला पाहिजे. विकासाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जातीद्वेष निर्माण झाल्याची असल्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, राज्यात अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. 70 वर्षे काँग्रेस देशाच्या सत्तेत होती. त्यांनी जातीवाद संपविला नाही. राष्ट्रवादीही राज्याच्या सत्तेत होती. पुणे परिसरात राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील दलितांवरील अत्याचार झाल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली असावी. त्याआधारे त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली केली असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.