डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:59 IST2025-09-28T12:58:25+5:302025-09-28T12:59:19+5:30
डोंबिवलीतील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.

डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
डोंबिवलीत एका तरुणाने एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आयुष्य संपवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बहुमजली इमारतीवरून खाली पडल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाने आत्महत्या का केली याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून त्या तरुणाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉलेजमध्ये तरुणाने आत्महत्या केली आहे. प्रेम प्रकरणातील वादानंतर त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला पण त्या यश आले नाही.
डोंबिवली सुदामा कॉम्प्लेक्समध्ये राहणार ऋषिकेश परब (२१ वर्षे) हा वंदे मातरम कॉलेजमध्ये शिकत होता. काल (२७ सप्टेंबर) सकाळपासून तो इमारतीत चिंतातुर अवस्थेत बसलेला होता. सकाळी ८ वाजल्यापासून ते १२ वाजेपर्यंत हा तरुण इमारतीत होता. त्यानंतर त्याने ११ व्या मजल्यावरुन फायर डकमधून उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच ११.४६ वाजता अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; तब्बल अर्धा तास अग्निशामक दलाचे अधिकारी पोलीस यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या उपस्थितीतच ऋषिकेशने उडी मारली.
या तरुणाने प्रेम प्रकरणाने आयुष्य संपवल्याचे समोर आले. प्रेयसीसोबत वाद झाला, या कारणातून रागात त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ११व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आयुष्य संपवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.#dombivli#maharashtra#CrimeNewspic.twitter.com/u9AQECUZhP
— Lokmat (@lokmat) September 27, 2025