शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'मी भाजपात प्रवेश करतोय' म्हणताच मंत्री एकनाथ शिंदेंसह सगळचे झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 09:02 IST

भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले.

ठळक मुद्देभाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील, त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ठाणे - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये स्थानिक नेतेमंडळींना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेकडूनही दुखावलेल्या आणि इतर पक्षांतील नेत्यांना शिवबंधन बांधण्यात येत आहे. त्यातूनच, केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने प्रतिस्पर्धी मनसेला धक्का दिला आहे. भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधळे. यावेळी, भाषण करताना महेश पाटील यांची चूक झाली, ही चूक खासदार श्रीकांत शिंदेंनी सुधारली अन् एकच हशा पिकला.  

भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले.  नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला.  भाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील, त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, भाषण करताना महेश पाटील यांच्याकडून चूक झाली. मी आज भाजपात प्रवेश करतोय, असं महेश पाटील म्हणाल्याने सगळेच अवाक् झाले होते. मात्र, तात्काळ खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांना आठवण करुन दिली अन् बाजूलाच बसलेल्या मंत्री एकनाथ शिंदेंना हसूच आवरले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  “श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामं सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत आहे. त्यामुळे भारावून जात मी स्वत: आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे,” असं महेश पाटील म्हणाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेना अशी आठवण करुन दिली. मग, सवय सूटत नाही, असे म्हणत पाटील यांनी चूक सुधारली. यावेळी एकनाथ शिंदेंसह सर्वचजण खळखळून हसले. 

दरम्यान, आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजप आणि मनसे या आपल्या प्रतिस्पर्ध्यावर धक्कातंत्राद्वारे एक पाऊल पुढे टाकले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेministerमंत्रीShiv Senaशिवसेना