Kalyan Crime: पुण्यातील कल्याणीनगरअपघाताची आठवण करून देणारी एक हृदयद्रावक घटना कल्याणमध्ये घडली आहे. पालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवल्याने मोठा अपघात घडला. कल्याणमधील नामांकित उद्योजक श्रीनिवास तांदळे यांचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
कल्याणमधील चांदोरे भागातून जाणाऱ्या रिंग रोडवर ही घटना घडली. उद्योजक श्रीनिवास तांदळे हे नेहमीप्रमाणे रात्री सायकलिंग करत असताना, पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की तांदळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पालकांचा हलगर्जीपणा भोवला
तपासानुसार, संबंधित अल्पवयीन मुलाने घरातील कारची चावी गुपचूप घेतली आणि तो रिंग रोडवर वेगाने गाडी चालवत सुटला होता. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत कार जप्त केली असून बुधवारी सकाळी त्या मुलाला ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे, अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन सोपवल्याबद्दल पोलिसांनी पालकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. मुलाच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात डिस्चार्ज मिळताच तिच्या विरोधात अटकेची कारवाई केली जाणार आहे.
रिंग रोड बनला 'डेथ ट्रॅप'
कल्याणचा हा रिंग रोड सध्या बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावरील सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स हटवल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला इथे रोज धोका निर्माण झाल्याच्या तक्रारीरहिवाशांनी दिल्या आहेत.
Web Summary : A 17-year-old's reckless driving in Kalyan killed businessman Srinivas Tandale while cycling. The teen used his family's car without permission. Police arrested the minor and filed charges against his parents for negligence. The ring road is now considered an accident hotspot.
Web Summary : कल्याण में 17 वर्षीय किशोर के लापरवाही से गाड़ी चलाने से साइकिल चला रहे व्यवसायी श्रीनिवास तंडाले की मौत हो गई। किशोर ने परिवार की कार बिना अनुमति के इस्तेमाल की। पुलिस ने नाबालिग को गिरफ्तार कर लिया और उसके माता-पिता पर लापरवाही का आरोप लगाया। रिंग रोड अब दुर्घटना का केंद्र माना जा रहा है।