"गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो"; कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, कॉलर धरुन केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:55 IST2025-06-22T15:52:04+5:302025-06-22T15:55:39+5:30

कल्याणमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धमकावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Traffic policeman beaten up and abused in Kalyan Case registered against youth | "गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो"; कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, कॉलर धरुन केली मारहाण

"गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो"; कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, कॉलर धरुन केली मारहाण

Kalyan Crime:कल्याणमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तापदायक होत चालला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावर अडकून पडावं लागत आहे. अशातच कल्याणमधल्या वाहतूक कोंडीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलीस हवालदाराने नियमभंग करणाऱ्या तरुणाला थांबवल्यानंतर त्याने संतापाच्या भरात पोलिसालाच शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. एवढ्यावरच न थांबता तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला थेट धमकावले. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला.

मंगळवारी कल्याणच्या शहाड- अहिल्यानगर उड्डाण पुलाजवळ रात्री वाहतूक कोंडीदरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केली. दुसऱ्या एका वाहतूक पोलिसाने आणि प्रत्यक्षदर्शीनी तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि पोलीस हवालदाराला मारहाण सुरुच ठेवली.

शहाड उड्डाणपुलाजवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस हवालदार सचिन ओंबासे हे वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मयूर केणे नावाचा तरुण विरुद्ध दिशेने बाईकवरुन शहाडकडे जात होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूने जाण्याचा सल्ला दिला. मात्र यावरुनच पोलीस कर्मचारी आणि मयूरमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या मयूरने ओंबासे यांच्या कॉलरला धरले आणि त्यांना ढकलत मागे नेले. त्यानंतर मयूरने शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. तू गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो अशी धमकी यावेळी मयूरने दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने ओंबासे यांच्या डोक्यात दगड मारण्याचाही प्रयत्न केला.

दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी आणि आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केल्यानंतर दोघांना वेगळ करण्यात आलं. याप्रकरणी महात्मा फुलै चौक पोलीस ठाण्यात मयूर केणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Traffic policeman beaten up and abused in Kalyan Case registered against youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.