शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले

By अनिकेत घमंडी | Updated: June 10, 2025 05:31 IST

४ ठार, ९ जखमी, दोघे गंभीर; मृतांत लाेहमार्ग पोलिस ठाण्याच्या जवानाचा समावेश; मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

अनिकेत घमंडी

डोंबिवली : मुंबईवरून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकणारे प्रवासी परस्परांना धडकल्याने सोमवारी सकाळी मुंब्र्यात झालेल्या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ जखमी झाले. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे कर्मचारी विकी मुख्यदल यांचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मुंब्रा स्थानकापाशी जलद मार्गिकांमधील अंतर कमी आहे. सकाळच्या गर्दीमुळे आत शिरण्यास जागाच नसल्याने दोन्ही लोकलच्या दरवाजात प्रवासी लटकत होते. त्यांच्या पाठीवरील बॅगांचा परस्परांना धक्का लागल्यामुळे हा अपघात घडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बराच वेळ काय झाले हे कोणालाच समजत नव्हते. काहींना गंभीर जखमा झाल्याने ते रक्तबंबाळ झाले, तर काहींना मुका मार लागल्याने त्यांची अवस्था शरीराची हालचाल करण्या पलिकडे होती. अनेक प्रवासी रुळाजवळच्या  खडीमध्ये पडले होते. असंवेदनशील रेल्वे प्रशासनाने मात्र आपली जबाबदारी झटकत दरवाजातून प्रवास करणाऱ्यांवर खापर फोडले.

जलद मार्गिकेवर ही दुर्घटना घडण्याच्या काही मिनिटे आधी पुष्पक एक्स्प्रेस कल्याणकडे रवाना झाली. त्यामुळे सुरुवातीला त्या एक्स्प्रेसमधील प्रवासी पडल्याची भीती व्यक्त झाली होती. जखमींना ५० हजार ते २ लाख रूपयांची मदत देऊ. उपचाराचा पूर्ण खर्च  सरकार करेल, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

दोन ट्रॅकमध्ये अंतर किती?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार दोन्ही ट्रॅकमधील अंतर ट्रॅकच्या मध्यापासून ५.३ मीटर असते, तर ट्रॅकच्या दोन्ही समोरासमोरील बाजूंपासून ३.६ मीटर एवढे असते.  लोकल एकमेकांना क्रॉस करताना सुमारे १.८ मीटर म्हणजे ५ ते ६ फूट अंतर असते. हे अंतर वळणदार भागात देखील तेवढेच असते.

अपघात स्थळी रुळांमधील नेमके अंतर किती? : रुळांमधील अंतर नेमके किती होते, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. त्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

जखमी प्रवासी...

आदेश भोईर (२६, रा. आटगाव, कसारा), रिहान शेख (२६, भिवंडी), तुषार भगत (२२), मनीष सरोज (२६ दिवा साबेगाव, दिवा), मच्छिंद्र गोतारणे (३९, वाशिंद), स्नेहा धोंडे (२१, रा. टिटवाळा), प्रियंका भाटिया (२६ रा. शहाड, कल्याण) या सात जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिंताजनक : शिवा गवळी (२३), अनिल मोरे (४०).