RPF जवानाने वाचवले प्राण, महिला अडकली होती फलाट आणि रेल्वेगाडीच्यामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 23:02 IST2020-11-18T23:01:00+5:302020-11-18T23:02:02+5:30
Accident Case : कल्याण स्थानकातील घटना

RPF जवानाने वाचवले प्राण, महिला अडकली होती फलाट आणि रेल्वेगाडीच्यामध्ये
कल्याणरेल्वे स्थानकात आज सकाळी साडेनऊ वाजता उद्यान एक्सप्रेस फलाटावर आली. त्याच वेळी एक प्रवासी महिला गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असताना गाडी सुटण्या आधीच आधीच ती गाडी आणि फलाट याच्यामध्ये सापडली . रेल्वे स्थानकावर उभे असलेले आरपीएफ जवान विजय सोळंकी यांनी ही घटना पाहताच तात्काळ प्रवासी महिलेच्या दिशेने धाव घेत तिला फलाट आणि गाडीच्या मधून बाहेर काढले. तिचे प्राण वाचवले . या घटनेमध्ये प्रवासी महिला बचावली आहे. तसेच आरपीएफ जवानाचे कौतुक केले जात आहे.