शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जा आढळल्यास परिणाम भोगावे लागतील, कल्याण-शीळ रस्त्याच्या कामावरून राजू पाटील यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:48 IST

MNS MLA Raju Patil News : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामाची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल.

कल्याण - भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामाची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल. ही गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास संबंधितांना त्याचे परिमाण भोगावे लागतील असा सज्जड इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संबंधितांना दिला आहे.कल्याण शीळ रस्याच्या कामाची पाहणी आमदार पाटील यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्य रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी, मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हा संघटक हर्षद पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. हा रस्ता पूर्ण होईल याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या आहेत. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. रस्ते कामात गती नाही हे सातत्याने दिसून येत आहे. रस्त्या ज्या ठिकाणी सिमेंटचा तयार केला आहे.त्याठिकाणी आत्ताच तडे गेलेले आहे. ज्या ठिकाणी जोड रस्ते या रस्त्याला येऊन मिळतात. त्याठिकाणी कल्वर्टची कामे झालेली नाहीत. त्यामुळे त्याठिकाणी एक बॉटेल नेक तयार झाला आहे. पावसाळ्य़ात कल्वर्ट तयार न झाल्याने त्याठिकाणी पाणी साचणार आहे. कल्वर्टची कामे काही ठिकाणी केली जात असली तरी यंदाच्या पावसाळ्य़ात रस्त्यावर पाणी साठणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यावर त्याची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल. त्यानंतर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे उघड झाल्यास त्याचे परिमाण संबंधित अधिकारी वर्गास भोगावे लागतील असा इशारा पाटील यांनी दिला आहे.  मागच्या आठवडय़ात राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापक विजय वाघमारे यांनी कल्याण शीळ रस्त्याच्या कामाविषयी महापालिकेच्या मुख्यालयात एक जंबो बैठक घेतली. या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकाही उपस्थित होते. या बैठकीपश्चात रस्ते विकास कामातील अडथळे दूर करुन काम येत्या पावसाळ्य़ार्पयत मार्गी लावले जाईल अशी माहिती दिली होती. त्या पश्चात आज आमदार पाटील यांनी स्वत: पाहणी करुन हे काम संथ गतीने सुरु असल्याचे स्पष्ट केल्याने काम नक्की कधी पूर्णत्वास येणार असा प्रश्न आत्ता उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली