भिवंडीत लेडीज बारवर छापा; ७ बारबालांसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Published: December 23, 2023 04:22 PM2023-12-23T16:22:10+5:302023-12-23T16:22:46+5:30

अंजुरफाटा ते धामणकर नाका रस्ता दरम्यान देवजी नगर या परिसरात सिल्व्हर पॅलेस बार अँड रेस्टॉरंट आहे.

Raid on ladies bar in Bhiwandi; A case has been filed against the customer along with 7 barbals | भिवंडीत लेडीज बारवर छापा; ७ बारबालांसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

भिवंडीत लेडीज बारवर छापा; ७ बारबालांसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

भिवंडी: भिवंडीपोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डान्स बार चे पेव फुटले असून तेथे सुरू असलेल्या बारबालां कडून अश्लील हावभाव करीत मद्यापी ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना नारपोली पोलिसांनी सिल्व्हर पॅलेस बार अँड रेस्टॉरंट वर केलेल्या कारवाईत सात बारबाला व पाच ग्राहकांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          

अंजुरफाटा ते धामणकर नाका रस्ता दरम्यान देवजी नगर या परिसरात सिल्व्हर पॅलेस बार अँड रेस्टॉरंट आहे. तेथील सात बारबाला अश्लिल हावभाव करून अश्लिल नृत्य करीत असतांना ग्राहकांचे मनोरंजन करीत असल्याच्या आढळून आल्याने बार मालक सुधाकर गणप्पा पुजारी,मॅनेजर जयंत कैलास पाडु,वेटर संतोष शंकर विशे,छोटु बाबुलाल हेमराम,ज्ञानेश्वर धावली घोष यांनी आपसात संगनमत करून बारमध्ये बारबालांना अश्लिल हावभाव करून ग्राहकाना आकर्षित करत होते.या प्रकरणी नारपोली पोलिसांनी स्वतः हून तक्रार दाखल करीत सात बारबाला पाच ग्राहक व पाच कर्मचारी अशा एकूण सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल करीत नोटीस बजावून सोडून देण्यात आले.

Web Title: Raid on ladies bar in Bhiwandi; A case has been filed against the customer along with 7 barbals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.