शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीचे भू भाडे भरण्यास ६०० पैकी ८४ निवासी भूखंडधारकांचा अल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:21 IST

एमआयडीसीमधील निवासी भूखंडधारकांना ०४ ते १५ मे पर्यंत भू भाडे देण्याची सुविधा उपलब्ध असताना गुरुवार १४ मे पर्यंत अंदाजे ६०० निवासी भुखंड असताना अवघ्या ८४ जणांनी म्हणजे १४% जणांनी भू भाडे भरल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली - एमआयडीसीमधील निवासी भूखंडधारकांना ०४ ते १५ मे पर्यंत भू भाडे देण्याची सुविधा उपलब्ध असताना गुरुवार १४ मे पर्यंत अंदाजे ६०० निवासी भुखंड असताना अवघ्या ८४ जणांनी म्हणजे १४% जणांनी भू भाडे भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे १५ मे रोजी भू भाडे भरण्यासाठी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात अखेरचा दिवस असल्याने या दिवशी आता किती जण भू भाडे भरण्यासाठी येणार हे पाहावे लागेल. तिथले वार्षिक भुखंड भाडे एक रुपया हे भरण्यासाठी ठाणे येथे जावे लागत असे. त्यासाठी प्रवासात वेळ व पैसा खर्च होत होता.

अनेक भुखंडधारकांचे मागील काही वर्षांपासून हे भू भाडे भरले गेले नव्हते. डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात तसेच ऑनलाईन पद्धतीने भू भाडे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने पत्र व्यवहार व पाठपुरावा केला होता. भाजप आमदार संजय केळकर यानी त्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी यांची मीटिंग घेऊन तात्पुरत्या स्वरूपात ते भू भाडे भरण्यासाठी ही सुविधा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात उपलब्ध करून दिली होती. मात्र तरीही एकंदर हे वार्षिक भू भाडे भरण्यास निवासी भूखंडधारकांचा अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. त्याची मुख्य चार कारणे आहेत. भू भाडे भरण्यासाठी अल्पमुदत दिली आहे त्यात शनिवार,रविवार एमआयडीसी कार्यालयाला सुट्टी असते.

भुखंडधारकांना आपली भरायची बाकी शिल्लक रक्कम किती आहे हे समजून येत नसल्याने अंदाजित रक्कम भरून त्याची पडताळणी एमआयडीसी ठाणे कार्यालयात होऊन काही दिवसांनी त्याची अंतिम पावती तयार होऊन डोंबिवली कार्यालयात येत आहे. त्यामुळे भुखंडधारकांना दोनदा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात फेरी मारावी लागत आहे. मे महिना हा सुट्टीचा असल्याने अनेक रहिवाशी गावी किंवा फिरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. कडक उन्हाळा, असल्याने उन्हात बाहेर पडण्यास नागरिकांची मानसिकता नसल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे म्हणाले.

शुक्रवार, १५ मे या अखेरच्या दिवशी राहिलेल्या निवासीधारकांनी आपले भुखंड भाडे भरावे असे आवाहन मिलापनगर रेसि. वेलफेअर असोसिएशनने केले आहे. तसेच एमआयडीसीने भू भाडे भरण्याची सुविधा कायमस्वरूपी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात तसेच ऑनलाईन करावी अशी मागणी मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने एमआयडीसीकडे केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Poor Response to MIDC Land Rent Payment; Only 14% Paid

Web Summary : Only 14% of Dombivli MIDC residential plot owners paid land rent despite temporary local payment availability. Short deadlines, calculation difficulties, and summer heat contributed to the low turnout. Residents urge permanent local and online payment options.
टॅग्स :dombivaliडोंबिवली