शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा; बाहेर कचऱ्याची दुर्गंधी तर आतील खोल्यात भंगार साहित्याचा ढीग

By सदानंद नाईक | Updated: May 11, 2026 20:14 IST

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सदानंद नाईक, उल्हासनगर : क्षमते पेक्षा दुप्पट रुग्णांना सेवा देणाऱ्या मध्यवर्ती रुग्णालयात स्वच्छता व साफसफाई याचा पुरता बोजवारा उडाला आहे. रुग्णालय प्रांगणात कचऱ्याची दुर्गंधी तर रुग्णालयातील खोल्यात व बाहेरील भागात भंगार साहित्याचे ढीग लागले आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या क्षमता पेक्षा जास्त रुग्ण भरती असून जागा नसल्याने, अनेकदा एका बेडवर दोन रुग्ण तर काही वेळा रुग्णासाठी खाली बेड टाकावे. लागते. रुग्णांची संख्या बघता ४०० बेडच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून रुग्णालय मागील भागात इमर्जन्सी रुग्णालयासाठी ५० बेडचे बांधकाम करण्यात येत आहे. तर बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेतात. डॉक्टर, नर्ससह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या ३०० पेक्षा जास्त आहे. डॉक्टरसह अन्य पदे रिक्त असल्याने, कंत्राटी व तासी डॉक्टरांचा भरणा जास्त असून उपचाराचा वानवा आहे.

 जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून रुग्णालयाच्या नूतनीकरण, रंगरंगोटी व इतर कामासाठी शासनाकडून तसेच आमदार, खासदार विकास निधीतून कोट्यावधीचा निधी रुग्णालयाला मिळतो. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण, कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घरण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. मात्र स्वच्छता व साफसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या वेळी महिला वॉर्डातील स्वछतागृह दरवाजे विना असल्याने, महिला रुग्णालयाची कुचंबाना झाली होती. ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू असल्याची सावरासावर करण्याची वेळ प्रशासनावर आली. रुग्णालय प्रांगणात कचऱ्याचे ढीग साचुन दुर्गंधी पसरली आहे. तर रुग्णालयाच्या आतील भागात भंगार साहित्याचे ढीग जागोजागी साचले आहे. 

रुग्णाच्या आरोग्याला धोका
 रुग्णालयात प्रवेश करतो त्याठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला असून साफसफाईची सर्वत्र वानवा असल्याने दुर्गंधी पसरली आहे. प्रांगणातील बाकड्या रुग्णा सोबत आलेले त्यांचे नातेवाईक विश्रांती घेतात. मात्र त्यांच्यासह रुग्णाच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. 

स्वच्छतागृह व वार्डात दुर्गंधी
 रुग्णालयात डीप क्लीन होत नसल्याने, स्वच्छतागृह अस्वछतेचे माहेरघर झाले. तर रुग्णालय वार्डात अस्वछतेने कळस गाठला आहे. अपघात विभागात येणाऱ्या अनेक रुग्णाचे रक्त खाली फरसीवर पडलेले असते. तर अनेक खोल्यात व रुग्णालया बाहेर भंगार साहित्याचे ढीग साचले आहे.

मध्यवर्ती रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू असून वापरण्यात न येणारे साहित्य जागा मिळेल त्याठिकाणी ठेवले आहे. तर अंतर्गत साफसफाई दररोज केली जाते. बाहेरील प्रवेशद्वारावरील कचरा उचलण्यात येणार आहे. (डॉ मनोहर बनसोडे, जिल्हाशल्य चिकित्सक, मध्यवर्ती रुग्णालय)

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Hospital Plagued by Filth; Garbage, Scrap Piles Abound

Web Summary : Ulhasnagar Central Hospital faces a sanitation crisis. Overflowing with patients, the hospital struggles with garbage, scrap piles, and unhygienic conditions, posing health risks. Despite funding for upgrades, cleanliness is neglected, impacting patient well-being and hygiene.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरHospitalहॉस्पिटल