शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:41 IST

डोंबिवलीतील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांची माहिती : कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी वेचून मारले

डोंबिवली (जि. ठाणे) : आम्ही सर्व जण खूश होतो, फोटो काढत होतो. एका ठिकाणी खाण्यासाठी थांबलो तेव्हा फायरिंगचा आवाज ऐकला. आम्हाला वाटले गेम्स चालू असतील. पण, अचानक फायरिंगचे आवाज वाढले. ‘आप लोगोंने आतंक मचा रखा है, हिंदू और मुस्लीम अलग हो जाओ,’ असे बोलत दोन दहशतवाद्यांनी थेट आमच्या घरातील कर्त्या पुरुषांच्या डोक्यात व पोटात गोळ्या मारल्या. हा थरकाप उडवणारा प्रसंग काश्मीरवरून परतलेल्या मोने, लेले व जोशी कुटुंबीयांनी माध्यमांसमोर कथन केला. मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पर्यटनस्थळी गर्दी असतानाही तिथे एकही लष्कराचा जवान अथवा सुरक्षा रक्षक का नव्हता, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पर्यटक येथे फिरायला येतात, त्यांचा दोष काय होता हे आम्हाला समजले नाही. सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का यांनी केली. वडिलांना आमच्यासमोर गोळ्या घालून मारले. खूप वाईट वाटले, संबंधितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव म्हणाला.

एनआयए टीमने घेतली तिन्ही कुटुंबांची भेटदहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबांची एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) टीमने गुरुवारी डोंबिवलीत भेट घेतली. हल्ल्याच्या दिवशी नेमके काय घडले याबाबत कुटुंबातील सदस्यांचा जबाब एनआयए नोंदवणार आहे. गुरुवारी तिन्ही कुटुंबांच्या घरी जाऊन केवळ भेट घेतली; पण, जबाब नोंदवला नाही. जबाबासाठी पुन्हा येऊ, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

त्यांनी आमचे काहीही न ऐकता गोळ्या घातल्या...संजय लेले यांचा मुलगा हर्षल म्हणाला की, आम्ही सर्व मंगळवारी दुपारी बैसरन घाटीत पोहोचलो. पठारावर जाण्यासाठी तीन तास लागतात. तेथे घोड्यावरूनच जावे लागते. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही खाऊन निघत असताना अचानक फायरिंगचे आवाज आले. गेम्स चालू असतील म्हणून पहिल्यांदा आम्ही लक्ष दिले नाही. परंतु, थोड्याच वेळात गोळीबार करणारे जवळ आले. स्थानिकांनी आम्हाला खाली झोपून राहायला सांगितले. आम्ही तसे केले. परंतु, तेथे आलेल्या दोघांनी ‘आप लोगोंने यहाँपे आतंक मचा रखा है; हिंदू और मुसलमान अलग हो जाओ,’ असे बोलत वडील, काका, मामाला गोळ्या घातल्या. माझ्या हाताला गोळी चाटून गेली आणि ती वडिलांच्या डोक्यात घुसली. त्यांनी आमचे काही न ऐकता गोळ्या घातल्या. आम्ही काही करू शकलो नाही. 

आईला खांद्यावरून भावंडांनी आणले खालीआम्हाला स्थानिक लोकांनी ‘तुम्ही येथून लगेच निघा आणि तुमचा जीव वाचवा,’ असे सांगितले. माझ्या आईला डाव्या बाजूला लकवा असल्याने तिला भावंडांनी खांद्यावरून तसेच पुढे घोड्यावरून खाली आणले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खाली पोहोचलो. तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सातच्या सुमारास सांगण्यात आली, सध्या कोणालाही हे सांगू नका, असेही बजावण्यात आले होते. डोंबिवलीतील काका राजेश कदम यांना संपर्क करून ही माहिती दिली. त्यांनी श्रीनगरमधील एका मित्राला फोन केला. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या घरात आमची राहण्याची सोय केली, असा संपूर्ण घटनाक्रम हर्षल लेले याने कथन केला.   

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला