'पक्षातील सर्व शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारस'; राष्ट्रवादी काँग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:11 PM2023-05-08T15:11:40+5:302023-05-08T15:13:13+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेस तपासे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

NCP spokesperson Mahesh Tapase has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | 'पक्षातील सर्व शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारस'; राष्ट्रवादी काँग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

'पक्षातील सर्व शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारस'; राष्ट्रवादी काँग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण तरीही पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत, असं 'सामना' च्या अग्रलेखात लिहिण्यात आलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून अनेक नेत्यांनी आपली मते मांडली.

सामन्याच्या अग्रलेखाची आम्ही सहमत नाही. पक्षातले सर्वच शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारस आहेत, असं राष्ट्रवादी पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले. 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी प्रत्येक ग्रामीण भागात व जिल्ह्यात जाऊन सर्व्हे करावे, त्यानंतर त्यांना कळेल एक दोन नव्हे तर लाखो संख्येने शरद पवारांच्या विचारांचे वारस असल्याचे सांगत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

दरम्यान, सामना अग्रलेखातून झालेल्या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही तो अग्रलेख वाचलेला नाही. सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो. एकत्रित काम करत असताना पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणे योग्य राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक आहे. काळजी करू नका, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

सामनात नेमकं काय म्हटलंय?

नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच', असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे असं सांगत ठाकरे गटाने अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

Web Title: NCP spokesperson Mahesh Tapase has criticized Thackeray group MP Sanjay Raut.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.