मोरीवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला आग, वायुगळतीने रहिवाशांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:02 AM2021-05-09T05:02:55+5:302021-05-09T05:03:59+5:30

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल, एमआयडीसीचे अग्निशामक दल आणि उल्हासनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते.

Morivali MIDC chemical company fire, air leak harass residents | मोरीवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला आग, वायुगळतीने रहिवाशांना त्रास

मोरीवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला आग, वायुगळतीने रहिवाशांना त्रास

Next

अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसी क्षेत्रात जैन ॲॅण्ड जैन या रासायनिक कंपनीला शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत रसायनाचा मोठा साठा असल्याने परिसरातील गावांनादेखील धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशामक दलाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
सुरुवातीला या कंपनीतून वायूगळती सुरू झाली होती. वायूगळती होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला देताच अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते. मात्र, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचतात कंपनीतील रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत भीषण आग लागली. यामुळे कंपनीतील ज्वलनशील रसायनांना मोठा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीतदेखील अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू 
केले.

मोठी दुर्घटना टळली 
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल, एमआयडीसीचे अग्निशामक दल आणि उल्हासनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले होते. या कंपनीच्या शेजारीच दोन मोठ्या रासायनिक कंपन्या असल्याने या कंपनीतील आग भडकली असती तर त्या दोन्ही कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला असता.

दीड तासानंतर आगीवर नियंत्रण 
तब्बल दीड तास त्यांचा प्रयत्न ही आग विझवण्यासाठी सुरू होता. मात्र आगीसोबत रसायनदेखील पेट घेत असल्याने परिसरात अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. घातक असे केमिकल हवेत आल्याने नागरिकांनी आपल्या घरातील दारे बंद करून घरात राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. 
 

Web Title: Morivali MIDC chemical company fire, air leak harass residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app