शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत मनसेनं घेतला बदला, ऐनवेळी भाजपात गेलेल्या जोडप्याला दणका; 'मनसेची जोडी' पुन्हा हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:51 IST

प्रभाग क्रमांक २२ मध्ये मनसेतून भाजपात आलेले प्रकाश भोईर यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मात्र मनसेच्या संदेश पाटील यांनी प्रकाश भोईर यांचा पराभव केला.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात पक्षप्रवेश कार्यक्रमांची चढाओढ लागली होती. त्यात भाजपाने मनसेचे माजी नगरसेवक असलेले प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांना पक्षात घेतले होते. मात्र याठिकाणी तर भाजपाचे विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने शिंदेसेनेत प्रवेश केला होता. यामुळे प्रभाग क्रमांक २२ येथील राजकीय समीकरण बदलले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरुवातीला भाजपा आणि शिंदेसेना युती होईल का अशी शंका होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपा शिंदेसेनेची युती झाली. या युतीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिंदेसेनेतून इच्छुक असलेले संदेश पाटील आणि त्यांची पत्नी रसिका पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे संदेश पाटील आणि रसिका पाटील यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश केला. मनसेनेही संदेश पाटील आणि रसिका पाटील यांना प्रभाग क्रमांक २२ मधून उमेदवारी दिली आणि या दोघांनी या संधीचे सोने केले. 

प्रभाग क्रमांक २२ मध्ये मनसेतून भाजपात आलेले प्रकाश भोईर यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मात्र मनसेच्या संदेश पाटील यांनी प्रकाश भोईर यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक २२ मध्ये शिंदेसेनेचे विकास म्हात्रे त्यांची पत्नी कविता म्हात्रे या दोन्ही निवडून आले. तसेच या प्रभागात मनसेचे संदेश पाटील आणि त्यांची पत्नी रसिका पाटील हे दोघेही निवडून आले. विशेष म्हणजे या प्रभागातील मनसे आणि शिंदेसेनेच्या विजयानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला. डोंबिवली मध्य आणि पश्चिम भागात मनसेला तरुणांचा मिळणारा प्रतिसाद ही भाजपासाठी डोकेदुखी ठरली. प्रभाग क्रमांक २२ मध्ये मनसेतून भाजपात गेलेले प्रकाश भोईर आणि शिंदेसेनेतून मनसेत आलेले संदेश पाटील यांच्यात चुरशीचा सामना झाला. त्यात मनसेचे संदेश पाटील विजयी झाले. 

वडील विजयी, लेक पराभूत

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये डोंबिवलीतून मनसेने सगळ्यात पहिलं खातं खोलले.  प्रभाग क्रमांक २१ मध्ये मनसेचे प्रल्हाद म्हात्रे  यांनी भाजपाचे उमेदवार प्रदीप जोशी यांचा पराभव केला. मात्र याच प्रभागातून प्रल्हाद म्हात्रे यांची कन्या वेदांगी म्हात्रे उमेदवारीच्या रिंगणात होत्या. परंतु वेदांगी यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु वडिलांचा विजय झाल्यामुळे वेदांगी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि त्यांनी वडिलांना मिठी मारली.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS avenges defection in Dombivli, defeats BJP couple; MNS pair wins!

Web Summary : In Dombivli, MNS retaliated against BJP for poaching leaders. MNS candidates Sandesh Patil and his wife Rasika Patil won against BJP's Prakash Bhoir. MNS and Shinde Sena celebrated victories together, signaling challenges for BJP.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे